Home चंद्रपूर नागभीड पोलिसांची कोंबड बाजारावर धाड : तीन आरोपीवर गुन्हा दखल

नागभीड पोलिसांची कोंबड बाजारावर धाड : तीन आरोपीवर गुन्हा दखल

181

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड : नागभीड तालुक्यातील पाहर्णी या गावात कोंबड बाजार भरत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 7सप्टेंबर 2025 रोजी पाहर्णी येथील जंगलात अवैध कोंबड बाजार भरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याची माहिती पो. स्टे. नागभीडला मिळताच पोलिसांनी धडक कारवाई करून तीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिनेश नकलू लसने वय 27 पाहार्णी, सौरभ जीवन सूर्यवंशी वय 26 पाहार्णी, बाळू चोखोबा मेश्राम वय 39 जुगनाळा ता. ब्रम्हपुरी यांच्या ताब्यातून ऐकून 6 कोंबडे 3000 रुपये व दोन कोंबड्याच्या पायाला धारदार कात्या किंमत 500 रुपये तसेच अंगझडतीत 710 रुपये असे ऐकून 4210 रुपयेचा मुद्देमाल मिळाला.
कोंबड्याच्या पायाला धारदार काती बांधून कोंबड्याशी झुंज लावून त्यावर पैस्याची बाजी लावून हार जितचा खेळ खेळत असताना मिळून आल्याने तीन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक नागभीड यांचे मार्गदर्शनाखाली पोऊप निरीक्षक अजिक्य गोविंदलवार, दिलीप चौधरी, भरत घोळवे, जय रोहणकर, प्रफुल रोहणकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here