


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड : मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून मंजूर केलेली कर्जे राष्ट्रीयकृत बँकांकडून काही प्रमाणात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी होत असून या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा आणि पाठपुरावा करून महामंडळ कर्जाबाबत योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक सांगली जिल्ह्यात नुकतीच पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे, उपाध्यक्ष संपतराव मोहिते, अरुण मोहितेअब्बास,, शिकलगार यांची उपस्थिती होती. यावेळी नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यामध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष दिपाली वाघमारे, सांगली जिल्हा कार्यकारी सदस्य अक्षय मिसाळ, आणि कराड तालुका कार्यकारिणी सदस्य अधिकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडीची पत्रे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, राज्यामध्ये वेगवेगळे विषय घेऊन, वेगवेगळे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते नेते आपल्या भूमिका पार पाडताना दिसत आहेत. परंतु बाबासाहेबांनी आर्थिक सक्षम असणारा व्यक्तीच चळवळीमध्ये निर्भीड आणि निःस्वार्थ काम करू शकतो. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने शासनाकडून असणारी कर्जासाठी ची सुविधा बँकिंगच्या अडमुठ्या धोरणामुळे आर्थिक सक्षम होताना अडचणी निर्माण होत आहे. या गोष्टीकडे मात्र चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांचे म्हणावे तेवढे लक्ष जात नाही ही खरी शोकांतिका आहे. चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून यापुढे मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून हाती घेतलेला विषय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. हे करत असताना जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ असेही विश्वास मोहिते यांनी सांगितले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.














