


जळगाव – स्वतःच्या आत्म्याची ओळख झाल्याशिवाय किंवा ‘स्व’ समजल्याशिवाय सिद्धपद प्राप्त होऊ शकत नाही. हे सिद्धपद म्हणजे आत्म्याची मुक्ती, अनंत ज्ञान आणि आनंदाची परम अवस्था. अरिहंत आणि सिद्ध भगवंतांनी आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. ते आपल्याला मोक्षमार्ग दाखवतात, कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचे स्मरण केल्याने आपले जीवन सफळ होते. आजच्या आधुनिक युगात ताणतणाव, डिप्रेशन, टेन्शन यांनी ग्रासलेल्या व्यक्तींना किंवा मंगळ आणि सूर्याचा प्रभाव प्रबळ आहे आणि जे दुःखी आहेत, त्यांनी ‘णमो सिद्धानम्’ या मंत्राची माळ जपावी. हा मंत्र सिद्ध भगवंतांच्या शक्तीने मनाला शांती देतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आत्मबल वाढवतो. रोजच्या जीवनात हा जप करा, ध्यानात बसून त्याचे स्मरण करा तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकेल. सिद्धाचा प्रतिकात्मक रंग लाल आहे. हा रंग समृद्धी, उत्साह आणि शक्ती दर्शवतो. तो आपल्याला प्रेरणा देतो की जीवनात सकारात्मकता आणा, कर्मांची शुद्धी करा. सिद्धपदाची आराधना करून आपणही सिद्ध बनण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यासाठी प्रखर साधना आवश्यक आहे. आचार्य प.पू. जयमलजी म.सा. यांच्या जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प.पू. डॉ. उदितप्रभाजी म.सा. आणि प.पू. डॉ.उदितप्रभाजी म.सा. यांनी श्रावक-श्राविकांसमोर विशेष प्रवचन केले.
आपल्या जीवनाची यात्रा सुरू आहे. या जीवन प्रवासात सुख-दुःख, अनुकूल-प्रतिकूल, चढ-उतार तर येणारच. यात दुःख येणे म्हणजे वेदनी कर्म उदय होणे आणि दुःखी होणे हे मोहनीय कर्माचा उदय होणे होय. सिद्ध पद मिळवायचेच असा दृढ निश्चय असेल तर त्या आत्म्याच्या सुखाची अनुभूती घेता येते व मोक्षपदी वाटचालीसाठी पुरुषार्थ करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)














