Home लेख ‘जीवनात कल्याण मित्र जोडले तर आपलेही कल्याणच होणार!

‘जीवनात कल्याण मित्र जोडले तर आपलेही कल्याणच होणार!

117

 

 

 

 

 

 

 

 

जळगाव -जीवन जगताना अनेक प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येतात. त्यामध्ये मित्र हे नाते इतर नात्यांपेक्षा ठळक असते. प्याली, थाली, टाळी, खाली आणि कल्याणमित्र असे मित्रांचे पाच प्रकार सांगितले. यापैकी कल्याणमित्र हा निस्वार्थपणे मार्गदर्शन करणारा आणि सर्वोत्तम असतो. ‘जीवनात कल्याणमित्र जोडले तर आपलेही कल्याणच होणार’ असे समजावून सांगताना ‘DOSTI’ या इंग्रजी शब्दाची फोड केली- डी: जे दूर असतात, परंतु सदैव जवळ असतात, ओ: इतरांमध्ये खास, एस: सदैव साथ देणारे, टी: तकदीरपेक्षा (नशिबापेक्षा) अधिक विश्वास ठेवणारे, आय: मी स्वतः असणे, आणि मित्राचीही आपल्याप्रती हीच भावना असते ते कल्याणमित्र होय. शाळेत किंवा गल्लीत एकत्र असणारे मित्र, काही कारणांमुळे किंवा संबंधांमुळे निर्माण झालेले मित्रत्व, कुळपरंपरेने झालेले मित्रत्व, जसे आजोबा, वडील आणि नंतरच्या तिसऱ्या पिढीतील मित्रांचे संबंध. सहकार्य किंवा मदतीमुळे निर्माण झालेले मित्रत्व. यासंदर्भात एका गुलाम आणि सिंहाचे विचारप्रवण उदाहरण देण्यात आले. राजाकडे गुलाम असतो. त्याला गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असते, म्हणून तो पळून जातो. घनदाट जंगलात आल्यावर त्याची सुटका होते, परंतु तिथे त्याला सिंहाची गर्जना ऐकू येते. ती गर्जना मदतीसाठी असते. एक मन त्याला सांगते की सिंहाला मदत न करता निघून जावे, कारण निघून गेले तरी राजाचे शिपाई त्याला पकडतील. दुसरे मन त्याला सांगते की सिंहाची मदत करावी. तो सिंहाला संकटातून सोडवतो आणि त्यांची मैत्री होते. पुढे शिपाई गुलामाला पकडून नेतात आणि त्याला भुकेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात सोडण्याची शिक्षा सुनावली जाते. योगायोगाने, त्या जंगलातील तोच सिंह त्या पिंजऱ्यात असतो. सिंह त्याच्यावर झपटणार, पण गुलामाला ओळखून त्याला कोणतीही इजा करत नाही. अशी असावी खरी मैत्री, असे प.पू. डॉ. उदितप्रभाजी यांनी आजच्या प्रवचनात मैत्रीचे महत्त्व सांगितले.
या प्रवचनापूर्वी प.पू. डॉ. इमितप्रभाजी यांनी प्रवृत्तीकाळ, प्रभावकाळ, परिणामकाळ आणि पुरावृत्तीकाळ या संकल्पना समजावून सांगितल्या. न सांभाळता कार्य करताना माणूस जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकतो, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत ‘KBN’ म्हणजेच ‘कुछ भी नही’ अशी सकारात्मक प्रतिक्रिया मनात ठेवावी या विषयी मोलाचा संदेश त्यांनी दिला.

 

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here