Home महाराष्ट्र श्री संत जनाबाई महाविद्यालयात ३२.५ केव्ही हायब्रीड सोलर सिस्टीम स्थापन

श्री संत जनाबाई महाविद्यालयात ३२.५ केव्ही हायब्रीड सोलर सिस्टीम स्थापन

128

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

प्रधानमंत्री उषा केंद्र सरकार पुरस्कत मंजूर योजने अंतर्गत शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयास ३२.५ केव्ही क्षमतेचे सोलर ऑन ग्रीड सिस्टी मंजूर झालेली होती.त्या अंतर्गत महाविद्यालयाने हायब्रीड सोलर प्रणालीचे ३२.५ केव्ही क्षमता असलेले हायब्रीड सोलर प्रणाली खरेदी केली व पुर्ण प्रणालीचे महाविद्यालयात दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी
स्थापना केली.
हायब्रीड सोलर प्रणाली वापरून पर्यावरणपूरक विज निर्मीती करणारे श्री संत जनाबाई महाविद्यालय हे परभणी जिल्हयातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.महाविद्यालयासाठी लागणारी सर्व विज निर्मिती या हायब्रीड सोलर प्रणालीद्वारे तयार करून महाविद्यालयात वितरीत केली जाणार आहे सदर हायब्रीड सोलर प्रणाली महाविद्यालयामध्ये प्रशासकीय इमारत व ग्रंथालय येथे अनुक्रम २० केव्ही व १२.५
केव्ही अशा सोलर उर्जामिर्मिती संचासह स्थापित करण्यात आली आहे.
सदर प्रणालीचे उद्घाटन श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.आत्माराम टेंगसे,उपाध्यक्ष ॲड. रमेशराव मोहोळकर,सचिव ॲड. संतोषराव मुंढे व सहसचिव दशरथराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत,पीएम-उषा समन्वयक डॉ.एस.व्ही.क्षिरसागर,उपप्राचार्य डॉ. सी.बी.सातपुते,महावितरण एमएसईबीचे प्रतिनिधी नरसिंग लटपटे,ग्रंथपाल डॉ.यु.आर.अघाव उपस्थित होते.महाविद्यालयाला हायब्रीड सोलर प्रणाली मंजूर केल्याबददल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, प्राचार्य, उपप्राचार्य व पीएम-उषा समन्वयक यांनी केंद्र सरकारच्या पीएम-उषा योजनेचे व राज्य सरकारच्या प्रकल्प संचालकाचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here