


गंगाखेड: येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक यांना ‘अभिरा फाऊंडेशन’ परभणी तर्फे “महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव” पुरस्कार अ.फा.चे अध्यक्ष पू. भंते मुदितानंद थेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्तिकुमार बुरांडे, प्र.पा.मिलिंद सावंत, स्वराजसिंह परिहार, भीमराव वायवळ, यशवंत भैय्या भालेराव, विशाल बुधवंत, प्रा.डॉ.रामप्रसाद खंदारे, डॉ.बी.टी.धुतमल, पंकज खेडकर, मा.किरण मानवतकर, नागेश सोनपसारे, डी.आर.तुपसुंदर, डॉ. भगवान जगताप, शिवाजी सुगंधे, मा.संजय बगाटे इ.मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ.एम.डी.इंगोले यांनी वामनदादा कर्डक यांच्या काव्य साहित्यावर व आंबेडकरवादी हिंदी दलित साहित्यावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध मासिके-आंबेडकर इन इंडिया-लखनौ, नागफणी-डेहराडून, प्रतिबद्धत-गोरखपुर, बोधिसत्व बाबासाहेब टुडे-लखनौ, वाङमय-अलिगढ, अक्षर वैदर्भी-अमरावती, पग-पग-लखनौ, शोधऋतु-नांदेड, अजंता-छ.संभाजी नगर (औरंगाबाद), दलित संवेग-लखनौ, वृक्ष वेली, शोध प्रवाह, रिसर्च जर्नी इत्यादी व अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेखन केले.
प्रकाशित साहित्य-यादों के झरोखे से (आत्मकथा), तू चांद बनकर रह गईं(काव्य संग्रह), आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक(संपादित आलेख), मराठवाडा के आंबेडकरी जलसाकार(संशोधन प्रकल्प), भारतीय परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य(शोधालेख), हिंदी साहित्य विविध विमर्श (शोधालेख), धरती आबा (नाटक) मराठी अनुवाद, यशोधरा(नाटक) हिंदी अनुवाद, माझ्या जीवनाच गाणं(वामनदादा आत्मकथा)-हिंदी अनुवाद, बी.ए.प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष पाठ्यपुस्तक लेखन इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत.
डॉ. इगोले यांनी अनेक विभागीय बैठका, शिबीरे सहभाग, राज्य स्तरीय, राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय परिषदेत विशेष अतिथी, सत्राध्यक्ष, हिंदी विशेषज्ञ, सहभाग, शोध निबंध वाचन, काव्य वाचन केले आहे. अनेक काव्य संमेलन, व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व अकादमिक कार्यात सहभाग घेतला आहे. लॉर्ड बुद्धा, आकाशवाणी परभणी वर चर्चा, व्याख्याने दिली आहेत. ऑनलाईन व्याख्याने, कवि सम्मेलने, मुलाखती घेतल्या व दिल्या आहेत.
या पुरस्कारा बद्दल श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आत्माराम टेंगसे, सचिव अड.संतोष मुंढे, कोषा.अड.सूर्यकांत चौधरी, प्राचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, डॉ. संतोष गायकवाड, कार्या.अ.भारत हत्तीअंबिरे, डॉ.उद्धव अघाव, डॉ. क्षीरसागर व सर्व सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी तसेच मित्र परिवारातून प्रोफेसर डॉ.इंगोले यांचे अभिनंदन होत आहे.














