


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : म्हसवड नगर परिषद कडून नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून त्यात दहा प्रभाग असे निश्चित करण्यात आले आहे परंतु म्हसवड मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये बोगस मतदान लावण्यात आलेल्या ची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे तरी मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी एकत्र बसून मतदार याद्या बनवण्याऐवजी फिल्डवर जाऊन बनवून बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनादवारे किशोर सोनवणे यांनी केली आहे
यां निवेदनामध्ये नमूद केलेआहे की प्रशासनाच्या निर्देशानुसार निश्चित केलेल्या 2011 सालानुसार शहराच्या 24.120.लोकसंख्येप्रमाणे निवडणुका पार पडणार आहेत असे एकंदरीत दिसून येत आहे परंतु प्रभाग क्रमांक चार यां प्रभागातील भगवान गल्ली अशा ठिकाणी बरीच मतदान यादीत नावे हे गावातले रहिवाशी नसताना इथे कोणताही प्रकारचा संबंध असताना लावलेले आहेत तरी आपण मतदार यादीची परिपूर्ण पडताळनी करूनच संबंधित व्यक्तीला वगळण्यात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान नावे लावणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करावी व बोगस मतदानाच्या आधारे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार नाहीत यांच्यासाठी आपण तातडीने उपाययोजना राबवून खबरदारी घ्यावी तसेच म्हसवडमध्ये कोणत्याही बूथ वर बाहेर गावचे मतदान नेते लागणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तसे आढळल्यास आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
यां मतदार याद्या अध्यावत करताना सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना न देता माणचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी स्वतः यात सहभाग घेऊन व लक्ष घालून यां याद्या अध्ययावत कराव्यात जेणेकरून जे कोणी बोगस नावे यादीमध्ये घालण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना आळा बसेल आणि निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल.
भविष्यात बोगस मतदार अथवा बोगस मतदान झाले तर आणि याध्या बोगस तयार केल्या गेल्या तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.














