Home चंद्रपूर आदर्श शाळेचे तालुकास्तरीय बुद्धीबळ, कुस्ती, योगा शालेय स्पर्धेत घवघवीत यश  आदर्श...

आदर्श शाळेचे तालुकास्तरीय बुद्धीबळ, कुस्ती, योगा शालेय स्पर्धेत घवघवीत यश  आदर्श शाळेच्या पंधरा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड.

150

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा (१४ ऑगस्ट)- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. विशेषतः कुस्ती, योगा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. तब्बल पंधरा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये कुस्ती खेळात वेगवेगळ्या वजन गटात
१४ वर्षांखालील गटातून –सूरज हरीचंद्र सोलनकर, सोहम लिंम्बाजी मुंडे, अमोघ मंगेश पहानपटे, मानव अनिल मोहितकर, १७ वर्षांखालील गटातून – संकेत गणपत मोहितकर, प्रतीक प्रशांत घरोटे, दर्शन रमेश भटारकर , बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील स्वरा दिनेश बेतावार, १७ वर्ष वयोगटातील सरिता रामजी पासवान, योगासन स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील परी संदीप वाघे, समीक्षा गणपत मोहितकर, वेदांती किशोर भोंगळे, आर्यन किशोर चिताडे, स्नेहित सुरेश सोनुले, नैतिक दिलीप चाफले यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आदर्श शाळेचा विजयाचा झेंडा मानाने उंचावला आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष सतिश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे , आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, क्रीडा शिक्षक बादल बेले , रूपेश चीडे, वर्गशिक्षक ज्योती कल्लुरवार, नवनाथ बुटले, विकास बावणे, जयश्री शिवणकर, शिक्षकवृंद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here