Home महाराष्ट्र शिक्षण घेतल्यावर मानसाला प्रगतीच्या वाटा दिसू लागतात-डॉ.किशन गारोळे

शिक्षण घेतल्यावर मानसाला प्रगतीच्या वाटा दिसू लागतात-डॉ.किशन गारोळे

115

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.शिक्षण घेतल्यावर मानसाला खरंच प्रगतीच्या वाटा दिसू लागतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात शिक्षणाला प्राधान्य देऊन शिक्षण घेतलेच पाहिजे.गंगाखेड मध्ये माझं नातं सांगत असताना मी जरी बाहेरून आलो तरी माझं नातं संत जनाबाई यांच्या विचाराशी जुळलेला आणि पुढे जाऊन सांगतो माझ्या आईचे नाव ही जनाई असल्यामुळे गंगाखेड शहराची जवळीकता जास्त महत्त्वाची आहे असे मला वाटते असे प्रतिपादन डॉ.किशन गारोळे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.

व्हाईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या वतीने (दिनांक ७ ऑगस्ट गुरुवार) रोजी शहरातील पोट विकार तज्ञ प्रसिद्ध सर्जन डॉ.किशन गारोळे
यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गवळी यांची उपस्थिती होती, व्हॉइस ऑफ मीडियाचे सचिव पत्रकार गुणवंत कांबळे, पत्रकार मकरंद चिंनके,पत्रकार बालासाहेब कदम,अशोक व्हावळे, पत्रकार राहुल साबणे,संपादक ॲड.उत्तम काळे,मिलिंद साळवे, संपादक प्रभु राठोड आदींनी कार्यकमाचे आयोजन केले होते याप्रसंगी बाबा शेख,वसीम शेख, भुजबळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपेकर यांनी केले तर आभार पत्रकार महेमूद शेख यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here