Home विदर्भ बिनाखीत अंधश्रद्धेचा फोल पर्दाफाश: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्यांनी केली प्रभावी...

बिनाखीत अंधश्रद्धेचा फोल पर्दाफाश: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्यांनी केली प्रभावी जनजागृती … भांडे पडलेच नाही, अन् गॅस पण अचानक सुरू झाला नाही, मोबाईल सुद्धा फेकला गेला नाही…

184

 

 

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489

भंडारा -तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील बिनाखी गावातील कैलास गौतम यांच्या घरी गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या रहस्यमय घटनांनी गावात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रभावी जनजागृतीमुळे या कथित “अलौकिक” घटनांना पूर्णविराम मिळाला आहे.

कैलास गौतम यांच्या घरात आठ दिवसांपासून भांडे आपोआप पडणे, गॅस अचानक सुरु होणे, साहित्य जळणे आणि मोबाईल गायब होणे अशा विचित्र घटनांची चर्चा होती. या घटनांमुळे घरातील सदस्य दहशतीत होते आणि भूत-प्रेत, जादूटोणा अशा अंधश्रद्धेच्या गोष्टींना उधाण आले होते.

ही माहिती मिळताच अखिल भारतीय अंनिसचे तालुका संघटक राहुल डोंगरे, कोषाध्यक्ष किशोर बोंद्रे, सचिव विजय केवट, सतिश पटले आणि सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कशोधन यांनी दिनांक २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तब्बल दोन तास त्या घरात वास्तव्य करून परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला.

या दोन तासांत कुठलाही रहस्यमय प्रकार घडलेला नाही. भांडे पडले नाही, गॅस सुरु झाला नाही आणि मोबाईलही जागा बदलला नाही. यावरून हे स्पष्ट झाले की ही कोणतीही अलौकिक घटना नसून मानवनिर्मित प्रकार आहेत.

राहुल डोंगरे यांनी स्पष्ट सांगितले की, “जगात भूत, भानामती, जादूटोणा, चमत्कार असे काहीही नसते. जे काही घडते ते माणसानेच घडवून आणलेले असते. विज्ञान आणि चिकित्सक दृष्टिकोनच हे अंधश्रद्धेवर उत्तर आहे.”
………..

पोलीस तपास सुरू:-

घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय कशोधन तपास करत असून घरातील सदस्यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकार कोणत्या हेतूने घडवले गेले याचा लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे.
—–

गावकऱ्यांचा जनजागृतीला प्रतिसाद:-

घटनेची माहिती मिळताच बिनाखी आणि शेजारील गावांतील लोक मोठ्या संख्येने गोळा झाले. अखिल भारतीय अंनिसचे राहुल डोंगरे यांनी जमलेल्या नागरिकांशी संवाद साधत अंधश्रद्धेविरोधात माहिती दिली. “जादूटोणा, करणी, भूतबाधा हे खोटे समज आहेत. वैज्ञानिक विचारसरणीच खरी शक्ती आहे,” असं आवाहन करण्यात आलं. अंधश्रद्धेला नाही म्हणूया, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारूया असे प्रांजळ मत व्यक्त केले.

कैलास गौतम यांच्या कुटुंबियांना अखिल भारतीय अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिलासा दिला असून आता त्या कुटुंबात शांतता नांदते आहे. अशा घटनांमुळे निर्माण होणारा भीतीचा वातावरण दूर करत समाजात शांतता, सुव्यवस्था आणि विवेकबुद्धी नांदण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे, असा ठाम संदेश या घटनेतून मिळतो.

जनतेला संदेश:

अंधश्रद्धा ही भीतीवर आधारित असते. विज्ञान हा सत्य शोधण्याचा मार्ग आहे. कोणतीही अनैसर्गिक घटना असेल, तर तिचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी प्रश्न विचारणे, समजून घेणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे हेच आधुनिक समाजाचे लक्षण आहे.
बिनाखी गावातील कैलास गौतम यांच्या घरी गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या रहस्यमय घटनांनी गावात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रभावी जनजागृतीमुळे या कथित “अलौकिक” घटनांना पूर्णविराम मिळाला आहे.


विज्ञानवादी दृष्टिकोनच अंधश्रद्धेवर उपाय – राहुल डोंगरे

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे म्हणाले:”आम्ही संध्याकाळी ७ वाजता घटनास्थळी गेलो आणि दोन तास घरात वास्तव्य केले. त्या काळात एकही रहस्यमय घटना घडली नाही. कोणतंही भांडे पडले नाही, गॅस सुरु झाला नाही, मोबाईल आपोआप हलला नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, अशा घटना ‘भूत’, ‘जादूटोणा’, किंवा ‘भानामती’ यांच्यामुळे नव्हे, तर पूर्णपणे मानवनिर्मित असतात. समाजाने अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. विज्ञान, विवेक आणि चिकित्सा हाच खरा मार्ग आहे.”
त्यांनी पुढे असंही सांगितलं: “कुटुंबियांना समजावून सांगितल्यावर त्यांच्यातील भीती दूर झाली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली भीती, अफवा आणि अशांतता वाढते. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here