


ब्रम्हपुरी – तांत्रिक शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत नेवजाबाई हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
दिनांक 21 जुलै 2025 रोजी, सोमवार या दिवशी 60 विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा सुसज्ज संगणक कक्ष शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैया साहेब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक सर व पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जिभकाटे सर यांचीही उपस्थिती लाभली.
यावेळी आ. श्री. अशोकजी भैया साहेब यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, “युग बदलले आहे, आता संगणकीय ज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. या अद्ययावत संगणक कक्षाचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा,” असे उद्गार काढले.
कार्यक्रमावेळी इयत्ता 8वी ड चे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. श्री. कानझोडे सर, पराते सर, वदनलवार सर, गायकवाड सर, करंबे सर आणि कलकोटवार मॅडम यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. वदनलवार सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जिभकाटे सर यांनी केले.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा संगणक कक्ष केवळ एक सुविधा न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक मजबूत पाया ठरेल, असा विश्वास संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.














