Home लेख बुद्धीवंताची कदर आणि आदर!

बुद्धीवंताची कदर आणि आदर!

153

 

 

भाजपने आताच एड. उज्वल निकम साहेब यांची राज्यसभेवर नियुक्ती करून घेतली. राष्ट्रपती कोट्यातून असली तरीही सिफारस तर भाजप ने केली आहेच. हे चांगले काम केले आहे.

भारतीय समाज कितीही डिंगा मारत असला तरीही बुद्धिमान, ज्ञानी, उच्चशिक्षित, नितीमान व्यक्तीची अवहेलना करतो. मुळातच बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी, प्रामाणिक व्यक्ती समाजाला नको असतो. म्हणून तर एड. निकम सारखे अनेक बुद्धिमान लोकांना नगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पसंत केले नाही. उलट जे दारू दुकानदार आहेत, रेती चोर आहेत, राशन चोर आहेत, डान्सबार चालवतात, गुंडगिरी करतात अशा लोकांना भारतीय मतदार जास्त पसंत करतात. असेही नाही कि यांचे चरित्र आणि कारनामे माहीत नाहीत. अगदी जगजाहीर असतांना सुद्धा!कारण हे असे चोर, गुंड उमेदवार मतदारांना मताचे बदल्यात पैसा देतात. मतदार मत विकतात. तरीही गर्व से कहो, हम हिंदू है. मेरा भारत महान, जय श्रीराम,जय भीम, जय शिवाजी म्हणतात. म्हणतात ते पाप झाकण्यासाठीच. त्यात उदात्त, उदार असे काहीच नसते. जळगांव जिल्ह्यातील आमदार आणि जळगाव महापालिकेतील नगरसेवक यांचे व्यवसाय पाहाता, वस्तुनिष्ठ पुरावा आणि दुजोरा मिळतो.

एड. उज्वल निकम हे जेष्ठ आणि यशस्वी विधीज्ञ आहेत. जरी त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पसंत केले नाही तरीही भाजप ने ती उणिव भरून काढली. त्यांना सन्मानाने राज्यसभेवर सदस्य घेतले. हे उत्तम धोरण आहे. उत्तम निती आहे. उत्तम कृती आहे. बुद्धीवंतांना लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेत सदस्य म्हणून निवडून आणणे किंवा नियुक्ती देणे हेच लोकशाहिला पोषक आहे. लोकशाही बुद्धीवंतांनी अमलात आणली. संविधान बुद्धीवंतांनी लिहीले. तर मग त्याचे पालन करणे,वहन करणे हे सुद्धा बुद्धीवंतांचेच काम आहे. ऐरागैरा, बेवडा, दारूडा, लफडा, दगड धोंडे माणसांचे नाही.

माझ्या जळगाव जिल्ह्यात कांग्रेसने दारूडा बेवड्या लोकांना जबाबदारी देत असतांनाच भाजप मात्र कायदेतज्ज्ञांना जबाबदारी सोपवत आहेत. याचा परिणाम तर जाणवणारच. राजकिय पक्षात, असेम्ब्ली आणि पार्लमेंट मधे कोणत्या गुणवत्तेच्या माणसांची निवड करतात यावर तुमचे भविष्य ठरते.

जे लोक पक्षाचे नेतृत्व करतात, जे लोक राज्याचे, देशाचे नेतृत्व करतात त्यांचे अंगी गुणग्राहकता असलीच पाहिजे. मराठी माणसे नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देतात. त्यांनी जिवलग मावळे सोबत घेतले. तर मग तुम्ही चोर का घेतले?गुंड का घेतले? जे तुम्हाला सोडून पळून गेले. असा पश्न मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांना विचारतो. चोर, गुंड याला कोणतीही राजकीय भुमिका नसते. तो संधी पाहून नेत्यांना पैसा पुरवतो. तोच माणूस ठाकरे, पवार, पटोले यांना आपला वाटतो. अशी माणसे सोडून निघून जातात. तेंव्हा गद्दार म्हणतात.

राजकीय पक्ष चालवताना तुमच्या सोबत कोण आहेत? तुम्ही कोणाला उमेदवारी दिली? उमेदवारी देण्यासाठी किती कोटी घेतले? मंत्री बनवण्यासाठी किती कोटी घेतले?तुम्ही जळगाव येऊन कोणाच्या घरी जाऊन भेटले? यावर तुमचे हेतू कळतात. आम्ही सामान्य माणसे तुमच्या दहशतीखाली जगत असलो तरीही आमची बुद्धी स्वतंत्र पणे काम करते. आम्ही तुमचा लवाजमा, थाटमाट पाहून भुलत नाही. आम्ही तुमची लाडकी बहिण किंवा बेवडा भाऊ नाहीत. कि फुकटची साडी आणि फुकटची दारू घेऊन प्रसन्न होऊ. याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवले पाहिजे.
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा लाभार्थी नाही. त्यामुळे जे समोर दिसते, अनुभवाला येते ते मांडतो. मी पत्रकार नाही कि चैनेल वाला नाही कि तुमच्या वाढदिवसाला तुमचे पाकिट घेण्यासाठी येईन. तुम्हाला आवडले किंवा न आवडले याची तमा बाळगत नाही. लोकांना रामायण आवडावे आणि मला पुरस्कार मिळावा या हेतुने रामायण लिहीलेले नाही. या हेतुने महाभारत लिहीलेले नाही. तोच हेतू माझा आहे.

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here