Home महाराष्ट्र गंगाखेड भाजपा मंडळाच्या वतीने स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

गंगाखेड भाजपा मंडळाच्या वतीने स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

152

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566516)

भाजपा मंडळच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 75 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून प्रतिमा पूजन करण्यात आले.भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या संपर्क कार्यालयावर (दिनांक 23 जून सोमवार) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जाणारे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.पुढे चालून त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.त्यांच्या राष्ट्रभक्ती,एकात्मतेच्या ध्येयासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पअर्पण करण्यात आले.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे,मंडळाध्यक्ष रवि जोशी,गौतम रोहीणकर,प्रशांत फड,ओम जवळकर,हिराजी मेहता,दिपक फड, हनुमंत मुंडे,देवानंद जोशी,अशोक कांबळे आदीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here