Home चंद्रपूर चिमूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य रेती वाटप

चिमूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य रेती वाटप

363

 

संजय नागदेवते, विशेष प्रतिनिधी मो.
94234 15604

नेरी-शासनाच्या विविध प्रमुख योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रास पर्यंत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक गौखनि 10 / 0125 /प्र.क्र.05 ख-दिनांक 30 एप्रिल 2025 मध्ये नमूद केले आहे, त्यानुसार चिमूर तालुक्यातील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरिता विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्याकरिता उमा नदीवरील पिपर्डा व खातोडा तसेच गोदणी नदीवरील बोडधा व सिरपूर येथील रेती घाट निश्चित करण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर व मुख्याधिकारी नगरपरिषद चिमूर व मुख्याधिकारी नगरपंचायत भिसी यांच्याकडील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थी यांची यादी प्राप्त झाल्यानंतर सदर चारही रेती घाटामधून घरकुल लाभार्थी यांना 34 34 ब्रास रेती विनामूल्य वाटपाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर घरकुल लाभार्थी यांना तहसीलदार यांचे मार्फत रेती वाहतुकीचा वाहतूक परवाना तयार करून ग्रामपंचायत अधिकारी यांचे मार्फत लाभार्थ्यांना घरपोच वाहतूक परवाना देण्यात येत आहे. सदर वाहतूक परवान्या वरती जवळचा वाळू गट नमूद केलेला आहे. तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यास घरपोच पास उपलब्ध करून दिल्याच्या दिनांक पासून ते 9 जून 2025 पूर्वी वाळू उचल करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील. पिपर्डा, खातोडा, बोडधा व सिरपूर या घरकुल लाभार्थ्यांकरिता राखीव ठेवलेल्या चार रेती घाटावर मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथक लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेले आहे.
आज दिनांक 26 मे 2025 रोजी पिपर्डा घाटातून लाभार्थी यांना विनामूल्य रेती उपलब्ध करून देण्यास सुरुवात झालेली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शना खाली पिपर्डा येथील घाटावर मकिशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर, श्रीधर राजमाने तहसीलदार चिमूर, श्री चिडे मंडळ अधिकारी, श्री शुभम बदकी, श्री स्वप्निल उमरे, श्री केतन घरकेले ,श्री अंकित नंदुरकर तलाठी तसेच गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी व संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचे उपस्थितीत घरकुल लाभार्थी यांना विनामूल्य रेती वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here