


राजुरा १५ मे
नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राजुरा तालुका युवती अध्यक्षा वर्षा छबन कोयचाळे यांचा वाढदिवस डेबू सावली वृध्दाश्रम चंद्रपूर येथे किराणा साहित्य व अल्पोपहार देऊन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, उपाध्यक्ष रवी बुटले, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा सूनैना तांबेकर, राजुरा तालुका महिला संघटीका संगिता पाचघरे, श्री डेबूजी बहुद्देशीय समाज विकास संस्था चंद्रपूर चे सचिव पन्नालाल चौधरी , वर्षा कोयचाळे यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यशवंत व्यवहारे यांनी डेबु सावली वृध्दाश्रमाची संपूर्ण माहिती दिली. तेथील सर्व व्यवस्था, वृद्धश्रमातील प्रवेश, निवास, आहार, आरोग्य तपासणी व इतर सर्व सोयी सुविधा याविषयी संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पन्नालाल चौधरी यांनी केले. तर आभारप्रदर्शन ज्येष्ठ महिला सुधाताई मुळे यांनी केले.
——————————————–
बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे अनेक उपक्रम, कार्यक्रम या संस्थेद्वारे राबविले जातात. कुठलेही अनुदान नसतांनाही नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य संस्थेतील दानशूर व्यक्तींच्या सहकाऱ्याने अविरतपणे सुरू आहे. भुकेल्याना अन्न, तहानलेल्या पाणी, उघड्यानागड्याना वस्त्र, गरिब विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत, पशू पक्षी मुक्या जनावरांची सेवेकरिता खारीचा वाटा उचलून सेवाभाव जपण्याचा प्रयत्न कायमच आमच्या संस्थेमार्फत राबविल्या जातो. वर्षा कोयचाळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला याबद्दल बेले यांनी समाधान व्यक्त केले.













