Home महाराष्ट्र फास्टट्रॅक कोर्ट चालवून घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

फास्टट्रॅक कोर्ट चालवून घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

222

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1फेब्रुवारी):-परभणी शहरातील हडको जवळील कालवा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना दिनांक २४ फेब्रुवारी रोजी घडली या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर होत असून गंगाखेड येथील सकल मातंग समाज बांधवांच्या वतीनेही निषेध व्यक्त करण्यात आला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी दि.28 फेब्रु शुक्रवार रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.

मातंग समाजातील गरीब अल्पवयीन मुलगी भंगार वेचण्यासाठी आपल्या मैत्रिणी सोबत हडको जवळील कालवा परिसरात गेली असता त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्या अल्पवयीन मुलीस बळजबरीने दुचाकीवर बसूऊन एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला ही घटना अत्यंत निंदनीय असल्याने सर्व स्तरातून त्रिव निषेध व्यक्त होत आहे सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवून घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी गंगाखेड येथील सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली आहे निवेदनावर रोहिदास लांडगे, चंद्रकांत खंदारे, आबा साळवे, विकास रोडे, भागवत जलाले, किरण उफाडे, अंकुश कांबळे, विलास लांडगे, सिद्धार्थ हातीआंबिरे, यांच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here