Home महाराष्ट्र भारतीय संविधान या महाग्रंथावरील महापरीक्षेचा निकाल जाहीर -ॲड. मंचकराव डोणे प्रथम तर...

भारतीय संविधान या महाग्रंथावरील महापरीक्षेचा निकाल जाहीर -ॲड. मंचकराव डोणे प्रथम तर भूपेंद्र कांबळे द्वितीय

194

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1मार्च):- आपला अभिमान, भारतीय संविधान ही भूमिका घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधानाच्या जन जागृतीसाठी, भारतीय संविधान साक्षरता अभियाना अंतर्गत विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित ऐतिहासिक भारतीय संविधान या महाग्रंथावर महाभव्य महापरिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून 275 अभ्यासकांनी ही परीक्षा दिली होती. या महाभव्य महापरीक्षेचा निकाल ॲड. करुणा विमल, अनिल म्हमाने, विश्वासराव तरटे यांनी आज जाहीर केला.

लातूर येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. मंचकराव डोणे यांचा मोठ्या गटात प्रथम क्रमांक आला असून प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस 5,00,000/- ज्यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके त्यांना मिळणार आहेत. तर जत जि. सांगली येथील भारतीय संविधानाचे अभ्यासक व सुप्रसिद्ध निवेदक भूपेंद्र कांबळे यांचा द्वितीय क्रमांक आला असून द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस 3,00,000/- ज्यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके त्यांना मिळणार आहेत. लहान गटात कु. सार्थक गावडे प्रथम तर कु. सुवर्णा सुतार द्वितीय क्रमांक आला आहे. 

महाभव्य महापरीक्षेत प्रत्येक गटासाठी 50 स्पर्धकांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली आहे. ते स्पर्धक पुढीलप्रमाणे मोठा गट सिद्धार्थ गायकवाड, मेघाराणी देशमुख, अपूर्वा पाटील, संकेत देसाई, आकाश कांबळे, ॲड. राम धुमाळ, प्रताप कांबळे, डॉ. सचिन पठारे, ऋषिकेश साळुंखे, विक्रम राठोड, दीपक दिवेकर, ॲड. राहूल घारे, प्रतीक्षा पाटील, दीक्षा गदडे, विवेक जंगम, डॉ. सुरेश सावंत, प्रा. कपिल पाटील, ॲड. महेश कांबळे, डॉ. कबीर माने, प्रा. रोहिणी पाटील, ॲड. अनुजा शिंदे, ॲड. सावली कांबळे, डॉ. राहुल देशमुख, जालिंदर भोसले, ॲड. सत्यजित देशमुख, प्रा. अलका माने, सतिश कांबळे, ॲड. मोहन शिंदे, डॉ. नीलम कांबळे, ॲड. मिलिंद झेंडे, अशोक कांबळे, ॲड. सुधीर रसाळ, ॲड. व्ही. एम. जाधव, दिलीप साठे, गोविंद पाटील, रमेश कांबळे, बबन सोनवणे, ॲड. अविनाश शिंदे, शांताराम माने, दत्तात्रय सूर्यवंशी, जयप्रकाश देसाई, प्रकाश कुंभार, ॲड. दीपक कांबळे, ॲड. जी. डी. पाटील, डॉ. विनायक पाटील, ॲड. बाबा जाधव, श्रुती माने, ॲड. संगीता सोनुले, ॲड. योजना देशमुख, सुजाता अडसूळ तर लहान गट लहान गट अभिजीत साठे, अंकुश काकडे, राजू सनशेट्टी, सोपान कुलकर्णी, राहुल देशमुख, राजश्री जामगे, गौरी शिंदे, अनिता पाटील, लक्ष्मण जगताप, सत्यजित पाटील, किरण लोहार, दिगंबर भेगडे, शौर्य कुंभार, लता पाटील, भरत कापसे, अंकिता देसाई, आकाश कांबळे, दादू कामत, दिनेश कांबळे, साकेत कुलकर्णी, सायली पाटील, सदाशिव लोखंडे, साहेबराव जाधव, आदित्य इंगळे, नवीन कापसे, केदार शिंदे, अलका मांडके, किशोर कदम, कुंदा राऊत, अण्णा देशमुख, सतिश कांबळे, आकाश लोहार, अभिजित सावंत, संजय पवार, राहुल कांबळे, सानिया मकानदार, साहेबराव पाटील, मनिषा काळे, सोनाली पाटील, ऋषिकेश देसाई, अर्चना काळे, लक्ष्मण पाटील, राहुल माने, अंकुश कांबळे, सुखदेव काकडे, बाबासाहेब पाटील, सुरेश पाटील, अंबरीश साठे, संजय सावंत, योगेश शेंडगे या स्पर्धकांना प्रत्येकी 3,000/- हजारांची पुस्तके मिळणार आहेत.

बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून संविधान प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here