Home महाराष्ट्र सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शरद गायकवाड यांची...

सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शरद गायकवाड यांची निवड

296

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.1मार्च):-श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित महाबीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असणारे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांची सातारा येथे रविवार दिनांक २ मार्च रोजी संपन्न होणाऱ्या सातव्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे संयोजक सचिन बगाडे व एडवोकेट संतोष कमाने यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

रविवार दि. २ मार्च रोजी सातारा येथील शारदाबाई पवार आश्रम शाळा, जकातबाडी, सातारा या ठिकाणी सातवे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलन शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. शरद गायकवाड हे फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी गेली ४० वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.

मातंग समाज व फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे लहुजी साळवे, मुक्ता साळवे या महापुरुषांच्या जीवनावर आधारित परिवर्तनवादी विचारांचा प्रसार- प्रचार करण्यासाठी आजवर त्यांनी १४ संशोधन ग्रंथ लिहिलेले आहेत. फुले, शाहू, अआंबेडकर, मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन, कोल्हापूर. भटके विमुक्त व आदिवासी साहित्य संमेलन, नाशिक. पुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलन- गोवा व भोर जिल्हा पुणे अशा अनेकविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉ. शरद गायकवाड यांनी आजवर भूषवलेले आहे.

संपूर्ण मराठवाडा विदर्भखानदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि गोवा या राज्याप्रमाणेच भारताबाहेरही रशिया, थायलंड, मलेशिया, भूतान, श्रीलंका, दुबई, मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये जाऊन त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा प्रसार – प्रचार करणारी व्याख्याने दिलेली आहेत व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधून संशोधन निबंध सादर केलेले आहेत.

डॉ. शरद गायकवाड यांनी नामांतर लढ्यात सहभागी होऊन दिन दलितांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध मोर्चे, निदर्शन अशा विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. साहित्यरत्न

अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव बाटेगाव येथील स्मारकाच्या प्रश्न संदर्भात त्यांनी केलेले आंदोलन त्याकाळी लक्षवेधी ठरलेले होते. बारेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रबास शिल्पसृष्टी द्वारे तयार करण्यामध्ये त्यांनी जंगले गुरुजी यांच्या समवेत दिलेले योगदान उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. अनेक पोतराजांचे जटा निर्मूलन करून अंधश्रद्धा निर्मूलन, भारतीय संविधाना चे संरक्षण संवर्धन करण्यासाठी त्यांनी आपली वाणी आणि लेखणी शिजवली आहे.

संविधान जागृती, संविधान साक्षरता हा त्यांच्या सामाजिक चळवळीचा मुख्य पाया आहे. त्याचबरोबर समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मानवी मूल्यांसाठी डॉ. शरद गायकवाड कार्यरत आहेत.

मॉरिशस चे पंतप्रधान पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या हस्ते त्यांना’ डॉ. बाबासाहेब अआंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलेले आहे. भूतान देशानेही त्यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे.

डॉ. गायकवाड यांची सातारा येते होणाऱ्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here