


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.24फेब्रुवारी):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात येणारे चैतन्य युवा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. केंद्रीय समितीची व आणि संमेलन आयोजन समितीची नुकतीच सभा चंद्रपूर येथे संपन्न झाली. सदर पुरस्कार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सांगडी (जि. आदिलाबाद )येथे येत्या ६ व ७ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे . पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व गौरवचिन्ह , शाल असे आहे . पुरस्कारासाठी खालील मान्यवराची निवड करण्यात आलेली आहे.
विनायक सोयाम (पंचाळा), पालीकचंद बिसणे( सिंदीपार), सतीश देवाळकर (अंतरगाव- खुर्द), भालचंद्र पारटकर (सांगडी) , सचिन झाडे (माजरी) ,श्रीनिवास खाडे (कोब्बई) या सहा जणांना जाहीर झालेला आहे.
निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे संमेलन समितीच्या वतीने भाऊ पत्रे , बळीराम बोबडे , संजीव पोडे, महेश सावलानी, नारायण सहारे, इंजि. विलास उगे, श्रीकांत धोटे, डॉ . गावंडे, विलास चौधरी, देवराव कोंडेकर, स्वागताध्यक्ष प्रभाकरजी नवघरे, संजय तिळसमृतकर, शिवाजी भेदोडकर, भूमा रेड्डी, एड. राजेंद्र जेनेकर , प्रा. नामदेव मोरे, महेंद्र दोनोडे, प्रेमलाल पारधी , आदींनी अभिनंदन केले आहे.














