


बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२७वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे म्हणाले, माता रमाई केवळ त्याग मूर्तीच नसून धैर्याची व कृतीची मूर्ती म्हणजे माता रमाई होती, प्रत्येकाने माता रमाईच्या पाऊलखुणाने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा माधवराव वैद्य (अध्यक्ष अस्मिता फाऊंडेशन) तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महासचिव डी. के. दामोधर, डॉ. राजेश वाढवे (सर्जन वाढवे हॉस्पिटल), मिनाक्षी सुधीर गोटे (मोटघरे) (समाजकल्याण निरीक्षक)
अश्विनी पुनवटकर (लोक संचालित साधन केंद्र), वर्षा आत्माराम जाधव,
उज्वला गोपाल जाधव, पुजा जय राठोड, आरोहि सचिन राठोड,
विजयमाला संभाजी साखरे, संगिता भारत कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम चरणामध्ये त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्या नंतर सिने पार्शगायिका रेशमा सोनवणे यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या विर मातेने शासनाची दहा लाखाची मदत नाकारून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समूहाने दिलेल्या आर्थिक मदतीचा स्विकार करून स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ जिवंत असल्याचे दाखवुन दिले म्हणुन या स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीत उभ्या असलेल्या कुटूंबाला वंचित बहुजन आघाडी तालुका पुसदच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची आई यांना पुसद येथे बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रियंका गायकवाड (खाडे) यांनी तर आभार प्रदर्शन विद्याताई नरवाडे यांनी केले.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, युवा तालुकाध्यक्ष संदीप आढाव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, जिल्हा संघटक कैलास धबाले, आय टी प्रमुख मधुर खिल्लारे, तालुका संघटक जयानंद भालेराव, शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, शहर संघटक मधुकर सोनवणे, प्रज्ञा पर्व जयंती उत्सव समिती 2024अध्यक्ष अर्जुन भगत, मिलिंद जाधव सर,राहुल पाईकराव, प्रितम आळणे,अमोल खंदारे, विनोद कांबळे, आकाश पठाडे, कृष्णा दांडेकर तसेच गाव खेड्यातील शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांनी अतिशय परिश्रम घेतले.














