Home महाराष्ट्र म्हसवड येथे एस. टी. स्टॅन्ड ते रथगृहापर्यत रस्त्यावर गतीरोधक करा स्थानिक...

म्हसवड येथे एस. टी. स्टॅन्ड ते रथगृहापर्यत रस्त्यावर गतीरोधक करा स्थानिक व्यापारी व नागरिकांची मागणी;वयोवृद्ध व विद्यार्थ्यांच्या जीवितास भरधाव वाहनांचा धोका…

260

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड /सातारा : मागील काही दिवसांत म्हसवड येथे एस. टी. स्टॅन्ड ते रथगृह मार्ग या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालक व रोड रोमिओ, बाईक राईडर आपली वाहने चालवत असल्याने या मार्गवर मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता स्थानिक नागरिक आणि व्यापारी, पालक यांच्या मधून वर्तवली जात आहे. तरी या रस्त्यावर गतीरोधक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,गेली कित्येक दिवसांपासुन या मार्गवर गतिरोधक बसविण्याची मागणी होत असताना स्थानिक प्रशासनने गतिरोधक बसविला नसल्यामुळे दर दोन दिवसाला लहान मोठे अपघात होताना पाहवयास मिळत आहेत परिणामी एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचा जीव जाण्याचीही शक्यता आहे .
एस टी. स्टॅन्ड ते रथमार्ग या दिशेला जाणारी वाहने सुसाट वेगाने वाहन चालक चालवताना पाहवयास मिळत आहे त्यातच तरुणाई धूम स्टाईलने आपल्या बाईक चालवत असल्याचे मत स्थानिक व्यापारी, नागरिकांच्या मधून वर्तवले जात आहे. तरी या मार्गवर नगरपालिका, प्राथमिक शाळा, भाजी मंडई, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,खाजगी दवाखाने,बँका असून नागरिक, जनावरे, शालेय विद्यार्थी यांची या रस्त्यावरून नेहमीच येजा सुरू असते. परिसरातील बहुतांशी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक हे चालतच या रस्त्यावरून रोज येजा करत असतात त्यामुळे या सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे ऐखादा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या मधून वर्तवली जात आहे.

तरी एस. टी स्टॅन्ड ते रथगृह या मार्गवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (एस. टी. स्टॅन्ड ) चौक या चौकातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर , महात्मा फुले चौक, नगरपालिका, जिवा महाले चौक, बाबर हॉस्पिटल या परिसरात गतीरोधक करण्याची मागणी स्थानिक व्यापारी, नागरिकांच्या मधून व शालेय विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून होत आहे यासाठी स्थानिक प्रशासनाने एखाद्याचा जीव जाण्याआधी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असे मत नागरिकांच्यातून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here