


अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड- मकर संक्रांती सणानिमित्त लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनच्या वतीने शहरातील डॉ.लाईन येथील जनरिक मेडिकल हॉल येथे महिला कामगारासाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन लॉयन्स महिलांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून सर्वांना उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले.
घरकाम करणाऱ्या कामगार महिलांना निमंत्रित करून, त्यांच्या कार्याचा गौरव करून, दैनंदिन जीवनातील त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद करून, सर्वांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष, गोविंद निरस, प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर, प्राचार्य बालाजी ढाकणे, डॉ. बालासाहेब मानकर, डॉ.सुरेश सूर्यवंशी, प्रा.डॉ.राजीव आहेरकर, प्रा. डॉ. अशोक केंद्रे, केंद्र प्रमूख संभाजी वाडेवाले, प्रतापसिंह ठाकूर, विठ्ठलप्रसाद पवार, संजय दुधाटे, भगवानराव काळे, दगडूशेठ सोमानी, विजयआप्पा सावरगावकर, कुबेर खांडेकर, डॉ.ज्ञानोबा तुरनर, डॉ. किशोर कुगणे, दरलिंग भुसणर, प्रा.संग्राम मुंडे, विश्वनाथ सोन्नर, हरिश्चंद्र राठोड, महादेव गीते आदी लॉयन्स पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
व्यासपीठावर सौ. निरस, सौ महानंदा वाडेवाले, प्रा. कल्पना देशमुख, सौ. गंगाबाई गीते, सौ.सोन्नर उपस्थित होत्या, एकूण 55 महिलांना ब्लॅंकेट देण्यात आले. त्यानंतर येथील दत्त मंदिर परिसरात असलेल्या वृद्धाश्रमातील पुरुष व महिलांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलप्रसाद पवार यांनी तर आभार केंद्र प्रमूख संभाजी वाडेवाले यांनी मानले.














