Home चंद्रपूर शासकीय औ. प्र. संस्थेत जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

शासकीय औ. प्र. संस्थेत जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

213

 

चंद्रपूर (प्रतिनिधी )-
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या मैदानावर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सिव्हिल लाइन्स स्टेट बँक शाखेचे प्रबंधक चेतन पवणारकर , आयएमसी चेअरमन सी.एम.राव, क्रीडा अधिकारी श्री. मोरेश्वर गायकवाड , श्री.एन. एम. अवारे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे , प्राचार्य किलनाके, गटनिदेशक टोंगे, गेडकर, नंदेश्वर , बोकडे,लेडांगे, सौ. झाडे ,सौ. निमसरकार उपस्थित होते.
याप्रसंगी सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले, जो व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करतो तो निश्चितपणे यशस्वी होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत यश प्राप्तीकरिता सातत्याने प्रयत्न करावे. आपला चंद्रपूर जिल्हा कुठेही कमी नाहीत तेव्हा आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी असा प्रयत्न करावा की, भविष्यात देशाला ऑलिम्पिक मेडल मिळेल. आपला जिल्हा चॅम्पियन बनावा, अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सी.एन. राव आणि चेतन पवनारकर यांनीही उत्तम आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या क्रीडा समितीचे कौतुक केले. संस्थेचे प्राचार्य वानखेडे यांनीही खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने स्पर्धेत सहभागी व्हावे , असे आवाहन केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले .‌ सूत्रसंचालन निदेशक पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी केले.
ही स्पर्धा संस्थेच्या नवनिर्मित मैदानावर तसेच स्टेडियमवर होणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आयटीआयचे प्रशिक्षणार्थी त्याच सहभागी होत आहे, हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here