Home मनोरंजन विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत प्राची बहादुरे प्रथम

विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत प्राची बहादुरे प्रथम

211

✒️बाळासाहेब ढोले(पुसद-यवतमाळ,प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.15जानेवारी):- वणी येथील विकास डान्स अकॅडमी वणी यांच्या मार्फत विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ११ व १२ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

या स्पर्धेत पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहाचे अधीक्षक व भारतीय बौद्ध महासभा पुसद तालुका सरचिटणीस विजय बहादुरे यांची कन्या प्राची विजय बहादुरे हिने प्रथम क्रमांक पटकविला.प्रथम क्रमांक आल्याबदल टीव्ही स्टार लावणी कलावंत शुभम बोराडे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार,शाल, श्रीफळ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

या यशाचे श्रेय तीने गुरु मंगेश चटारे वणी व प्रजावती विजय बहादुरे (आई वडील) यांना दिले.या यशाबद्दल तिच्यावर सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here