Home महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावरील बहुजनांच्या नेत्या बहन मायावती

राष्ट्रीय स्तरावरील बहुजनांच्या नेत्या बहन मायावती

124

15 जानेवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथील श्रीमती सुचिता कृपलानी हॉस्पिटलमध्ये मायावती यांचा जन्म झाला. मायावती यांचे वडील गौतम बुद्ध नगरातील बदलापूर गावात पोस्ट ऑफिस कर्मचारी असतानाच मायावती यांनी 1975 रोजी दिल्ली येथील विद्यापीठात कालींदा कॉलेजमध्ये बी.ए.पूर्ण करत पुढे १९८३ मध्ये एल. एल.बी., बी.एड. शिक्षण पूर्ण केले. 1976 मध्ये मिरज विद्यापीठ अंतर्गत व्ही.एम.एल. जी. कॉलेज गाजियाबाद मधून शिक्षिकी म्हणून काम केले.

शिक्षकीची नोकरी करत असतानाही शिक्षणाचा खंड होऊ दिला नाही. भारतीय प्रशासन व्यवस्थेतील राज्य पूर्व परीक्षा हा सुद्धा अभ्यास चालूच असत जीवनामध्ये अत्यंत मोठ्या जिल्हाधिकारी पदावर जाण्याची इच्छा/ध्येय असल्यामुळे शिक्षणामध्ये खंड पडू देत नसतानाच त्यामध्येच बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष काशीराम यांची भेट झाली. मायावती यांना कलेक्टर बनणे मान्यवर काशीराम यांना भेटी दरम्यान समजले ” बहुजन चळवळी साठी जीवन समर्पित असणारे काशीराम फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी पे बॅक टू सोसायटी सोसायटीच्या माध्यमातून मायावती यांना फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सांगत चळवळी मध्ये सामावून घेतले. बहुजन चळवळीची दशा आणि दिशा सांगत मार्गदर्शन केले. आणि संपूर्ण कायद्याची माहिती वकील मायावती यांनी काशीराम यांच्या मार्गदर्शनातून बहुजन चळवळीला धार दिली.

मा.कांशीराम यांनी 1984 मध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना करत “होऊ शकत हे ” अशी म्हणत संपूर्ण भारतामध्ये बहुजन चळवळीची मशाल पेटवत 1989 मध्ये मायावती यांना खासदार म्हणून पाठवले. बहुजनांचे प्रश्न संसदे मध्ये मांडत असताना प्रस्थापित व्यवस्थेतील त्या वेळेचे उत्तर प्रदेशातील गुंडाराज संपवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. एक दलित महिला मुख्यमंत्री होऊ शकते यातूनच “शासनकर्ती जमात बनण्याचे ” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न भारत देशामध्ये उत्तर प्रदेश या राज्याने दाखवून दिले. सलग चार वेळेस मुख्यमंत्रीपद राजकीय गनिमी काव्यामधून स्वतःकडे घेत उत्तर प्रदेश सारख्या राज्याला दाखवून देत भारत देशातील तमाम बहुजनवादी पक्षांना प्रेरणा दिली. तमाम भारतीयां साठी आपलं जीवन समर्पित करणारे मान्यवर काशीरामजी यांचा वारसा चालवत अविवाहित मायावती यांनी बहुजन समाजासाठी जीवन समर्पित केलेआहे.

महाराष्ट्र राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा सुरू असताना औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यावे यासाठी प्रस्थापित व्यवस्थेपुढे पंधरा ते वीस वर्षे संघर्ष करावा लागला परंतु बहिण मायावती यांनी “शासनकर्ती जमात ” बहुजन वर्ग झाला तर काय होऊ शकते, यासाठी गौतम बुद्ध विद्यापीठ, छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर करत कोशिंबी जिल्हा, महात्मा फुले जिल्हा, शाहू महाराज जिल्हा, अशी नामांतर नामांतराची मालिका लावत त्यातूनच शैक्षणिक विकासाची द्वारे तमाम बहुजन वादी तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. उत्तर प्रदेशातील दलित बहुजन समाजांना 1997 मध्ये सरकार स्थापन केले, त्यावेळेस हजारो भूमी रहिवाशींना सरकारी गायरानाचे पट्टे देत उदरनिर्वाहाचे साधन, निवारा करण्यासाठी घर पिण्याचा प्रश्न संपवून टाकला.

त्या वेळेचे उत्तर प्रदेशातील गुंडाराज संपवण्यासाठी मायावती यांनी इतर गुंडांना तर सजा दिलीच परंतु आपल्या पक्षातील खासदार उमाकांत यादव यांनाही जमीन बळकावण्याच्या प्रकरणात राहत्या घरी अटक केले. भयमुक्त शासन व्यवस्था चालवण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये मायावती यांनी बहुजनाच्या राजकारणाला गती देत बहुजनातील राष्ट्रीय पक्ष आजही अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते.                      

   पत्रकार- राहुल साबणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here