Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

136

✒️विद्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

विद्यानगर(दि.10जानेवारी):- “महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगाचा विचार करून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने तत्पर असणे गरजेचे आहे. यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व देशाने मान्य केले होते. कारण त्यांच्याकडे कर्तृत्व, वक्तृत्व व नेतृत्व होते.” असे विचार वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये सौ. वेणूताई चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांनी मांडले.

या स्पर्धेला जिल्ह्यातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. चांगल्या नियोजनामुळे व आयोजनामुळे या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातील प्रथम क्रमांक कु. स्नेहा संदीप थोरात, (यशवंत हायस्कूल, कराड) हिने मिळवला. द्वितीय क्रमांक कु. आलिशा नासिर मुलाणी (विठामाता विद्यालय, कराड), तृतीय क्रमांक कु. शर्वरी दादासाहेब गोरे (लाहोटी कन्या प्रशाला, कराड) व उत्तेजनार्थ क्रमांक चि. प्रतीक दादासाहेब पवार (श्री संत तुकाराम विद्यामंदिर, मल्हारपेठ) यांनी मिळवला. तसेच उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. अक्षदा शिवाजी जाधव (यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक कु. प्रिया अशोक खंडकर (यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्यूट,सातारा) ), तृतीय क्रमांक कु. मधुजा तानाजी सुर्वे (सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड), उत्तेजनार्थ क्रमांक कु. अनुष्का अंकुश बोर्गे (कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज, ढेबेवाडी) हिने प्राप्त केला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री पी. ए. यादव, श्रीमती यू. पी. पाटील व श्री टी. डी. जाधव यांनी काम पहिले. उपप्राचार्य कांबळे आर. ए. यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती एन. एच. जाधव यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन श्रीमती पी. एस. सादिगले यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील पर्यवेक्षिका मधाळे एस .एस. तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here