Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळेच महिलांची प्रगती-डॉ. क्रांती मुंडे

सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळेच महिलांची प्रगती-डॉ. क्रांती मुंडे

172

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5जानेवारी):-गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रांती मुंडे उपस्थित होत्या,गोदावरी स्वच्छता अभियान चे प्रमुख एडवोकेट राजू देशमुख व स्मिता देशमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त इंदुमती कदम, प्रतिभाताई वाघमारे प्रभाताई राजेंद्र शिवमाला लांडगे, सौ वाडेवाले ताई, कुमारी फड ताई उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. क्रांती मुंडे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पुणे येथील भिडे वाड्यात शाळा काढली , 1857 ला पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लेगची साथ होती त्यावेळी अस्पृश्य समाजाच्या पांडुरंग गायकवाड ला जीवदान दिले, समाजातल्या प्रत्येक मुलीची व महिलांची आदर्श जर कोण असेल तर त्या सावित्रीबाई फुले आहेत आज आम्ही समाजामध्ये ताट मानेने फिरतोय.यावेळी केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले, क्रीडा शिक्षक आर राठोड , माणिकराव मुंडे, उमाकांत कुलकर्णी, बाळू डमरे, शिवप्रसाद कल्याणी, प्रा अमोल ढाकणे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here