Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ व ‘सामूहिक वाचन कार्यक्रम’ संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ व ‘सामूहिक वाचन कार्यक्रम’ संपन्न

174

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.1जानेवारी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत दि. ३० व ३१ डिसें. २०२४ या दरम्यान ग्रंथालयात महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचा ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

तसेच दि. ०१ जाने. २०२५ रोजी महाविद्यालयात ‘सामूहिक वाचन उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचानाविषयी जागृती निर्माण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्र.रजिस्ट्रार डी.एम.पाटील, सौ.एम.टी.शिंदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकार व्ही.पी.हौसे, ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे, सौ.ए.व्ही.जाधव, डॉ.डी. पी.सपकाळे, डॉ.एम.एल.भुसारे, सौ.एस. बी.पाटील, वाय.एन.पाटील, एस.जी.पाटील, सौ. एस.पी.पाटील, एन.पी.सोनवणे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व वाचन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.एस. ई.चौधरी, कु.के.टी.वासनिक, अमोल पवार व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here