Home चंद्रपूर झाडीशब्द साधक पुरस्काराने मनीषा रमेश पेंदोर सन्मानित

झाडीशब्द साधक पुरस्काराने मनीषा रमेश पेंदोर सन्मानित

141

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31डिसेंबर):-मोठीबेरडी(गोंडपिपरी) येथे प्राथमिक शिक्षिका असलेल्या आणि झाडीबोली साहित्य मंडळाच्या सक्रिय सदस्य असलेल्या श्रीमती मनीषा रमेश पेंदोर (मडावी) यांना झाडी शब्दसाधक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वरोरा येथे संपन्न झालेल्या झाडीबोली साहित्य संमेलनात आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते त्यांना प्रस्तुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झाडीबोली साहित्य मंडळाचे डॉ. हरिश्चंद्र बोरकर , एड. लखन सिंह कटरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हाप्रमुख कवी अरुण झगडकर, वरोरा शाखाध्यक्ष पंडित लोंढे , भाऊ थुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती पेंदोर या कवितांची निर्मिती ,प्रासंगिक लेखन करित असतात . तसेच पेन्शन संघटना आणि
शिक्षण क्षेत्राततही आपली सेवा देत असून त्यांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. जन्मापासून मृत्यू पर्यंत आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. त्याचप्रमाणे बोली माय सुद्धा आपल्या सोबत असते.
या बोलीचा वारसा निरामयपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहील, अशी भावना यावेळी श्रीमती पेंदोर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here