


✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.24डिसेंबर):-देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभर उमटत असतानाच कोल्हापूर मधील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा व फुले, शाहू, आंबेडकरवादी आणि समतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा कोल्हापूर पन्हाळा येथिल मसाई पठार येथील बुद्धांचा वारसा सांगणार्या प्राचीन बौद्ध लेण्या या ठिकाणी जाऊन सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक दिवस पुस्तके वाचून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणार असल्याचे अभिवचन घेतले.
त्यानंतर मी आंबेडकर, मी आंबेडकर, मी आंबेडकर, मी आंबेडकर अशा घोषणा देत थेट बौद्ध लेण्यामधून अमित शहांचा निषेध केला.यावेळी अनिल म्हमाने म्हणाले, संविधान विरोधी भूमिका घेणारे अमित शहा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमित शहा यांच्यावर देशाचे पंतप्रधान कोणतीही कारवाई न करता त्यांनाच पाठीशी घालत आहेत ही खूपच खेदाची गोष्ट आहे.
मदन पवार म्हणाले, अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित चुकीचे विधान केले आहे. त्यांनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे.
ॲड. करुणा विमल म्हणाल्या, अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ठरवून अपमान केला असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.यावेळी अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, मदन पवार यांच्यासह अंतिमा कोल्हापूरकर, विश्वासराव तरटे, विश्वनाथ कांबळे, अर्हंत मिणचेकर, संदीप कांबळे, अमर पारखे, नीती उराडे, सार्थक गावडे यांच्यासह धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा व फुले, फुले, शाहू, आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते.














