Home महाराष्ट्र सम्यक बुद्ध विहार येथे संविधान दिन उत्साहात साजरा (संविधान उद्देशिकेचे...

सम्यक बुद्ध विहार येथे संविधान दिन उत्साहात साजरा (संविधान उद्देशिकेचे वाचन)

232

 

✒️सिद्धार्थ दिवेकर [यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी] मो.9823995466

उमरखेड (दिनांक 26 नोव्हेंबर) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही अशी भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथांग परिश्रमातून देशाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये संविधान लिहून भारतीय संविधान देऊन अमूल्य देणगी दिली आहे.

सर्व नागरिकांना एकसमान समता, न्याय, बंधुता, हक्क व अधिकार देऊन भारतीय संविधान निर्माण करून लोकशाही जिवंत ठेवली आहे.

आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजता भारतीय संविधान दिन सम्यक बुद्ध विहार येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिराबाई दिवेकर (माजी नप नगरसेविका उमरखेड) हे होत्या.

उपस्थित सर्वच रमामाता महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिराबाई दिवेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिका चे वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या आयोजन रमामाता महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी मानले तर आभार उषाताई इंगोले अध्यक्ष (रमा माता महिला मंडळ) यांनी मानले.

यावेळी जिजाबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, जानकाबाई इंगोले, भारताबाई दिवेकर, यशोधरा धबाले, आनंदाबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर, कांचन दिवेकर, सुनीता दिवेकर, बेबाबाई गवंदे, मधुबाला दिवेकर, उज्वला धबाले, अमोल दिवेकर, कु.संघवी दिवेकर, कु.अंतरा गायकवाड इत्यादी अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here