


आपल्याला आता आणि आजतरी लोकशाही शिवाय पर्याय नाही. जर कोणी सरफेरा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा सेनापतीने हिटवर, मुसोलिनी, सद्दाम, किम जोन ची भुमिका घेतली, तोपर्यंत तरी!
या लोकशाहीत आमदार खासदार हेच विकास कामांचे सरकार दरबारी प्रतिनिधी आहेत. म्हणजे तुमच्या गाव शिव चे, तालुक्याचे, जिल्हाचे. तोपर्यंत तरी तुमच्या मर्जीने आमदार खासदार निवडून देऊ शकतात. आता हा आमदार खासदार कसा पाहिजे, ते निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. प्रत्येकाने एक मत देऊन. .अजून तरी मत देणे सोपे आहे. जरी त्यात पैसा,दारू,साडी,भांडी देऊन दुष्टपणा केला असला तरीही.
या लोकशाहीवर राजा नाही, हुकुमशहा नाही पण राजकीय पक्षांनी आघात केला आहे. मोदी, ठाकरे, पवार, राहुल गांधी म्हणतात, हा आमचा उमेदवार. आम्ही यांचेकडून काय उपटायचे ते उपटले आणि उमेदवारी तिकीट दिले. तुम्ही याला निवडून द्या. मग आम्ही असेच आमदार जमा करून प्रेमाने, लालचेने, सक्तीने एकत्र करून सरकार बनवू. आमचे सरकार तिजोरी लुटणार. आम्हीच सरकार,आम्हीच पोलिस, सीआयडी, सीबीआय, इडी, कोर्ट , निवडणूक आयोग आमच्याच मालकीचे राहिल. आम्हाला पाहिजे त्याला जेलमध्ये ठेवू. जो चरणी आला, शरण आला त्याला घरी सोडू. ते सुद्धा पैसा घेऊनच.हे आजचे चित्र आहे. हीच तर हुकुमशाहीची सुरूवात आहे. हुकुमशाही अशीच घट्ट होते. बुद्दीमान, उच्चशिक्षित ज्ञानी लोकांनी यांचा अभ्यास शाळा कॉलेज मधे केलाच आहे. निर्बुद्ध, अशिक्षित,पशु लोक असा अभ्यास करीत नाहीत.
म्हणून हे हुकुमशाही कडे जाणारे,नेणारे नेते अशाच मुर्ख लोकांना पैसा, दारू, मटण, साडी, भांडी देऊन निवडून येण्याचा प्रयत्न करतात.म्हणून तर राजकारणात, सरकारमध्ये गुंड गुन्हेगार, चोर, स्मगलर शिरलेले आहेत. ही धोक्याची घंटा आहे.याचा आवाज संवेदनशील माणसाला ऐकू येतो.
मी स्पष्ट सांगतो. या मुर्ख आणि पशु मतदारांना मी शहाणे करण्याचा प्रयत्न केला. पण तसे मीच काय गौतम बुद्ध, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सुद्धा थकलेत. म्हणून तर मी अधिकतम बुद्धिमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक लोकांना संबोधन करतो. त्यांना माझे विचार कळतात,काम आवडते. असेच लोकांचा मी राजकारणात काम करणारा प्रतिनिधी आहे.
मी, शिवराम पाटील आता जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली आहे. ही उमेदवारी माझा जिवन चरितार्थ चालवण्यासाठी नाही. मला श्रीमंत होण्यासाठी नाही. दारू, रेती, हॉटेल, डान्सबार, सट्टा चालवण्यासाठी नाही. तर मला प्राप्त बुद्धी ज्ञान निती यांचा अवलंब करून जनतेचे जिवनहित साधण्यासाठी आहे.
यास्तव आपण बुद्धिमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक लोकांनी ही जबाबदारी माझे एकट्यावर सोडून न जाता आपणही सांभाळावी. मी तर प्रचार करतोच आपण सुद्धा प्रचार करावा. कि आपला एक माणूस शिवराम पाटील या चोर बाजारात तग धरून उभा आहे. तो आम्हाला तुम्हाला सरकार दरबारी आमचा तुमचा प्रतिनिधी हवा आहे.तर मग आपण *प्रत्येक सज्जन माणसाने आपल्या परीने, शक्तीने, युक्तीने, भक्तीने प्रचार करावा.हि नम्र विनंती करीत आहे.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














