सुयोग सुरेश डांगे, (विशेष प्रतिनिधी ) मो. 8605592830
चिमूर-वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ विभागीय संयोजन प्रमुख तथा माजी राज्यमंत्री डाँ रमेश गजभे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्टी देवून चिमूर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार कीर्तिकुमार भांगडिया यांना जाहीर पाठिंबा दिला.
चिमूर येथील भांगडिया यांचे वाड्यावर आयोजित माना जमात स्नेहमिलन सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विदर्भवादी नेते डाँ. रमेश गजभे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देवून त्या पक्षाचा त्याग केल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत भाजपा उमेदवार कीर्तिकुमार भांगडिया, डाँ. दिलीप शिवरकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाकडे, जितेंद्र मोटघरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
माना जमातीच्या शासनस्तरावरील समस्या भाजप उमेदवार भांगडिया यांच्या माध्यमातून निकाली निघू शकतात असा विश्वास असल्यामुळे त्यांना जाहीर समर्थन देऊन विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डाँ गजभे यांनी सांगितले.
दरम्यान माना जमात स्नेहमिलन सोहळ्यात मार्गदर्शन करताना आपल्या समाज बांधवाना भाजप उमेदवार भांगडिया यांना विजयी करण्यात आपल्या जमातीचे हीत /फायदा कशा प्रकारे होईल याबाबत सविस्तर कथन केले,गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून कांग्रेसने माना जमातीवर अन्याय केला, त्यांचेसोबत आम्ही कधीही जवळीक करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.