Home सामाजिक  मी बालविवाह करणार नाही-मुलींनी घेतली शपथ

मी बालविवाह करणार नाही-मुलींनी घेतली शपथ

293

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड -संत जनाबाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे बाल विवाह प्रतिबंध जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ सूर्यमाला मोतीपोळे यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाह प्रतिबंध संबंधी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध संबंधी शपथ देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मी बालविवाह करणार नाही व माझ्या गावामध्ये व परिसरामध्ये बालविवाह होऊ देणार नाही अशी शपथ देण्यात आली याप्रसंगी सौ सूर्यमाला मोतीपोळे यांनी कायद्याने बालविवाह करणे हा गुन्हा आहे व तसे केल्यास कायद्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद होतो मार्गदर्शन केले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे , हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ .एम.डी. इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश सुर्वे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here