Home चंद्रपूर तळोधी नाईकचे काँग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी खांद्यावर घेतला भाजपाचा झेंडा

तळोधी नाईकचे काँग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी खांद्यावर घेतला भाजपाचा झेंडा

65

 

चिमूर -विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून तळोधी नाईक कांग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी भाजपात प्रवेश केला.

चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव राजकीय महत्व प्राप्त आहे. तळोधी ग्रामपंचायत वर सध्या काँग्रेसची सत्ता आहे, येथील उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे माध्यमातून होत असलेला विकासाचा सपाटा बघून भाजपात प्रवेश केला. यामुळे पुन्हा भाजप मजबुती कडे वाटचाल करीत आहे.

आमदार बंटी भांगडिया यांच्या वाड्यावर प्रवेश प्रसंगी भाजप जेष्ठ नेते राजु देवतळे, प स माजी सदस्य अजहर शेख, भाजपा युवा नेते समीर राचलवार, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे, तळोधीचे माजी सरपंच कलीम शेख, निलेश गभणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, तळोधी येथील भाजपा नेते नामदेव नन्नावरे, वनसमिती अध्यक्ष किशोर येसांबरे, भाजपा युवा नेते अविनाश सोनवाने, गोवारी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र नेवारे, टेकेपार आदिवासी सोसायटी उपाध्यक्ष रमेश भोयर, माधव वांढरे, नथुजी श्रीरामे, अशोक नेवारे, बूथ अध्यक्ष अंकुश मेश्राम, सलीम शेख आदी तळोधी (नाईक) भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here