Home चंद्रपूर चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप चौकाचे आता छत्रपती संभाजी महाराज चौक असे...

चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप चौकाचे आता छत्रपती संभाजी महाराज चौक असे झाले नामकरण

192

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

 

 

चिमूर -चिमूर ते भिसी व कांपा मार्गांवर असलेल्या हजारे पेट्रोल पंप जवळील चौकाला आता छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देवून आज (दिनांक 26ऑगस्ट ) नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या चौकाला यापूर्वी हजारे पंप चौक किंवा पिंपळनेरी रोड चौक असे संबोधित करण्यात येत होते, आता छत्रपती संभाजी महाराज चौक अशी ओळख निर्माण करण्यात आली आहे,
नामफलकाचे अनावरण करताना सामाजिक कार्यकर्ते पवन बंडे, स्नेहल शंभरकर, प्रज्वल बोबडे, राकेश साठोणे, बंटी कोरेकार, पवन ताकसांडे, रोशन येळणे, अमोल चौके, अमोल गोठे, पवन डुकरे, सुमित भिडेकर, विशाल कुबडे, विलास मोहिनकर, सचिन डांगे, प्रवीण हजारे, सुभाष बंडे, चिराग कथोडे, गणेश गोठे, प्रशांत डवले आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here