


नाशिक (प्रतिनिधी) नविन नाशिक येथे 13/8/2024 मंगळवार पासुन नवीन नाशिक सिडको कार्यालय येथे नागरिक संघर्ष समिती सिडको यांच्या वतीने प्रमुख उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या व नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले असून समितीच्या मागण्या खालील प्रमाणे
1) नाशिक सिडकोच्या मिळकती विनामूल्य फ्रीहोल्ड करणे..
2) मिळकत धारक ह्यात असताना त्यांच्या वारसांचे त्यांच्या संमतीने नोंद घेणे..
3) लहान लहान टपरी प्लॉटला बांधकाम पूर्णत्वाची अट रद्द करणे..
4) हस्तांतरण शुल्क व वेगवेगळ्या नावाखाली घेण्यात येणारे प्रशासकीय शुल्क रद्द करणे..
5) मिळकतीला बांधकाम परवानगी मनपा देत असल्याने मनपा त्याचे शुल्क वसूल करते मात्र सिडको कार्यालय सुद्धा विस्तारीकरण या नावाखाली शुल्क वसूल करते ते रद्द करावे यांसह अन्य मागण्या साठी तीन दिवसापासुन उपोषण चालु असताना सिडको प्रशासनाने वरील मागण्या ४ थ्या दिवसी मागण्या मान्य करण्यात आल्या आहे
वरील प्रमाणे मागण्या असून सिडको प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गांगुर्डे यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, गणेश पवार, धनंजय बुधडे, दशरथ गांगुर्डे, किरण थोरात, काशीनाथ दिंडे, रावसाहेब पाटील, सुमन तांबे,दैनिक महाभारत चे निर्भिड पञकार शांतारामभाऊ दुनबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.














