Home महाराष्ट्र मानवतावादी गझलांचा भाष्यकार वामनदादांच्या गझलांतून मानवी दुःख,वेदना,विरह,विद्रोह व संविधानिक मूल्यांची पेरणी झाली...

मानवतावादी गझलांचा भाष्यकार वामनदादांच्या गझलांतून मानवी दुःख,वेदना,विरह,विद्रोह व संविधानिक मूल्यांची पेरणी झाली : गझलकार संजय गोरडे गझल-गुंफा कार्यशाळेतून नवोदितांवर केला गझल संस्कार

164

 

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: मानवतावादी गझलांचा भाष्यकार म्हणून इतिहास,वर्तमान व भविष्यात वामनदादा कर्डक यांचे नांव चिर स्मरणात राहील त्यांच्या गझलांतून मानवी दुःख,वेदना,विरह,विद्रोह व संविधानिक मूल्यांची पेरणी झाली असून ते सामाजिक लढ्यातील चळवळीचे गझलसूर्य होते असे मत सुप्रसिद्ध गझलकार संजय गोरडे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्ती भूमी अभ्यासिका यांच्या पाचव्या वर्धापन दिन तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त
गझल-गुंफा हा नवोदित गझल लेखन करणाऱ्या साठी गझल लेखन सादरीकरण तंत्र गझल आकृतीबंध कार्यशाळेतून नवोदितांवर गझल संस्कार करतेवेळी ते बोलत होते वामनदादा कर्डक यांचे साहित्य गीत गझल व नाट्य संहिता याबद्दल माध्यमे समीक्षक व प्रस्थापित समाज व्यवस्था जाणीवपूर्वक लिहिणे बोलणे टाळत असते परंतु त्यांचे गीत गझल नाट्य साहित्य हे लोक माणसाच्या काळजावर गोंदले गेले असून ते लोकांच्या तहयात काळजात घर करून आहेत असे उद्गार यावेळी बोलताना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक तथा मुक्ती भूमी अभ्यासिका व सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक शरद शेजवळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवियत्री आरती खरात ह्या होत्या संतोष भाऊ कुंड सुरेश खडे विकास वाहून अभिमन्यू शिरसाठ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुक्तीभूमी अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेल्या राहुल भालेराव महाराष्ट्र पोलीस याचा सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी नवोदित कवी समीक्षा मेथे गायत्री गोरे स्वाती अवताडे यांनी आपल्या कविता सादर केल्या यावेळी वाचनालयाचे गायत्री गोखले सायली पवार जयश्री सदाफळ समृद्धी वाणी दीपक गायकवाड प्रवीण गायकवाड कृष्णा पाबळे नंदू सोमासे विकास शिंगाडे शितल चिंचवणे साक्षी मोरे कोमल देशमुख छाया मोरे हिरामण मेश्राम सागर गावित संदीप दळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमास वाचक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेजवळ यांनी केले.
सूत्रसंचालक राजरत्न वाहूळ यांनी केले.आभार सायली पवार हिने मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धार्थ गरुड,रवी गरुड,राहुल माळी, मानव जाधव यानी विशेष परीश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here