Home चंद्रपूर ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान चा नाविन्यपूर्ण उपक्रम

ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान चा नाविन्यपूर्ण उपक्रम

474

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी -ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. येथे दिनांक 15 ऑगस्ट ला सकाळी 8.00 वाजता संस्थेचे अध्यक्ष श् रुपेशजी निहाटे , संपूर्ण संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रधान मॅडम, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयातून तृतीय वर्षाची प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी पारेख जितेंद्र मैंद मु. चकबोथली यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली.

 

नाविन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात ठेवण्याचा उद्देश की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आवड निर्माण व्हावी व मला सुद्धा अशी संधी मिळावी अशा प्रकारच्या मानसन्मान मिळावा ही जिद्द निर्माण व्हावी तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यात समोरची संधी मिळेल की नाही म्हणून या प्रकारची संधी महाविद्यालयातून त्यांना उपलब्ध करून दिली जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात हा एक अविस्मरणीय क्षण राहावा हाच महाविद्यालयाचा तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष रुपेश निहाटे सर यांचा हेतू आहे. महाविद्यालयातील या कार्यक्रमाची समाप्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गावातील ग्रामपंचायत मध्ये नेऊन ग्रामपंचायतच्या तिरंगी झेंड्याला मानवंदना देऊन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here