Home महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे तलाठी...

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे तलाठी पदी नेमणूक झालेबद्दल यश ढोले यांच्या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब पिसे यांचे गौरवोद्गार

346

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : म्हसवड येथील नामांकित असणाऱ्या अहिंसा पतसंस्थेमध्ये तलाठी पदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले की, तलाठी हा शासन आणि सामान्य नागरिक यांना जोडणारा दुवा असतो. आणि त्यांनी चांगले काम केले तरच खऱ्या अर्थाने जनसामन्यांना न्याय मिळणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी सर्व प्रथम उपस्थितांचे सत्कार करणेत आला.त्यानंतर तलाठी पदी नेमणूक झालेले यश ढोले यांचे शाल व भेटवस्तू देऊन समाजिक कार्यकर्ते व मा.आमदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी बाळासाहेब पिसे यांचेहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तलाठी परीक्षा पास झालेले यश यांनी एवढ्यात न थांबता आणखी प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदे मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, पुढे ते म्हणाले की, अहिंसा पतसंस्था व नितिन भाई दोशी हे फक्त बँकिंग न करता यशस्वी झालेल्या प्रत्येक घटकाच्या पाठीवर थाप टाकण्याचे त्यांचा गुणगौरव करण्यात अव्वल स्थानी असतात. तसेच
एखाद्याच चांगल झालेल 100 पैकी 5 लोकांना जमत त्यापैकी एक म्हणजे नितिन भाई दोशी हे आहेत.
आपले मनोगत व्यक्त करताना म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन भाई दोशी म्हणाले की, यश ढोले यांची तलाठी पदी नेमणूक झाली ही तर खऱ्या अर्थाने म्हसवड वासियांसाठी अभिमानाची व कौतुकाची गोष्ट आहे.” जे नाही लालाटी ते करी तलाठी” तलाठी हा प्रशासन व नागरिक यांच्यातील मुख्य दुवा असलेने त्यांनी इमाने इतबारे जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कार मूर्तींच्या भाषणात चि. यश म्हणाले की, नितिन काकांचे पेपरात लोकांचे सत्कार केलेले बातम्या बघून मला यातून खूप प्रेरणा मिळायची आणि जे मी मनात ठरवलेलं की नितिन काकांना आपला सत्कार करण्याची संधी द्यायची आणि ती वेळ आली.आणि मी ते काकांच्या प्रेरणेन करून दाखवलं याचं खूप समाधान आहे.
या कार्यक्रम प्रसंगी,संस्थेचे संचालक अनिल गाडे, माजी नगरसेवक संग्राम शेटे, विनोद रसाळ, चेतन ढवन, शिवाजीराव जाधव, सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अजीम तांबोळी, सुरज करमाळकर, रिलस्टार ऋषिकेश देशमुख,चरण माने, प्रवीण केवटे,आमदार कलेक्शन चे मालक तुषार शेंडगे,निखिल माळी, सागर नामदे , संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ , कर्मचारी व अधिकारी तसेच म्हसवड मधील सुजाण नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार अक्षय धट यांनी मानले.
*चौकट- अहिंसा पतसंस्था ही पैसे आणि व्याजच देत नाही तर प्रेम ही देत असते – जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here