Home महाराष्ट्र कृष्ण गीता नगरवासीयांनी मानले प्रशासनाचे आभार !… कृष्ण गीता नगर मधील...

कृष्ण गीता नगरवासीयांनी मानले प्रशासनाचे आभार !… कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांचे लवकरच काँक्रिटीकरण होणार !..- विलास महाजन

194

 

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – नगरपालिका हद्दीतील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथील पावसाळ्यामुळे रस्त्याची अतिशय खराब अवस्था झालेली होती. रस्त्यावर मुरूम टाकण्याची विनंती प्रशासनाला व स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली असता प्रशासनाने दखल घेऊन रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला व रस्त्याची समस्या ही सुटलेली आहे म्हणून कृष्ण गीता नगरवासीयांनी प्रशासक जनार्धन पवार व स्थानिक पदाधिकारी शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी विलास महाजन यांनी नमूद केले की, लवकरच कृष्ण गीता नगर मधील रस्ता काँक्रिटीकरण होणार आहे मग नगरवासीयांना कुठलीही अडचण राहणार नाही. याप्रसंगी कृष्णविता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनि, कोषाध्यक्ष पी डी पाटील, जे एस पवार, एस एन कोळी, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, निलेश कुलट, अनिल कुलट, भरत पाटील, गोकुळ महाजन, संजय सुतार, ज्ञानेश्वर पवार, पंकज मिस्तरी तसेच कृष्ण गीता नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here