चिमूर -विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामाच्या माध्यमातून सपाटा सुरु असतानाच चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय स्मार्ट करण्या करिता जिल्हा खनिज निधीतून तब्बल 5.98 कोटी रुपये मंजूर करण्यात त्यांना यश आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे अनेक सोयी सुविधाचा अभाव होता तेव्हा काही दिवसा अगोदर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी केली हॊती.
तेव्हा त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयातील सोई सुविधा विषयी प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. आणि आज अखेर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे प्रयत्न यशस्वी झाले असून चिमूर क्रांतीभूमितील उपजिल्हा रुग्णालय लवकरच स्मार्ट होणार आहे.
त्याबद्दल चिमूर परिसरातील जनतेनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार व्यक्त केले आहे.