


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 18 जून) तहसील कार्यालयाच्या अंतर्गत पैनगंगा नदीला जोडून असलेला महागाव रोडवरील ओढ्यातील बैलगाडीतून अवैध रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्याऱ्या बैलगाडी चालकांवर कारवाई करावी.
असे तक्रारी निवेदन भीम टायगर सेना शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष, यवतमाळ) यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
उमरखेड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत पैनगंगा नदीला जोडून असलेला महागाव रोडवरील ओढ्यातील बैलगाडीतून अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात उत्खनन करून ही रेती शहरात आणून एक हजार, दीड हजार, दोन हजार अशा चढ्या भावाने विक्री करत आहेत.
सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या सर्व बैलगाड्या दिवसातून सात ते आठ ट्रिप करत आहेत.
यामुळे महसूल विभागाचे अतोनात नुकसान होत असतांना असे दिसून येत आहे.
यावर महसूल विभागातील संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांचे जाणून बुजून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
म्हणून अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या बैलगाडी चालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
चौकट :- बैलगाडीच्या कार्यवाईचा त्यावर दंड लावण्याचा असा कोणताचं नियम नाही.
पण अवैधरित्या वाहतूक करून रेती उत्खनन करणाऱ्या बैलगाडी चालकांवर गुन्हा दाखल करू शकतो – उपविभागीय अधिकारी सखाराम मुळ
सदर कारवाई सात दिवसाच्या आत करण्यात यावी.
अन्यथा भीम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी तक्रारकर्ते शाम धुळे, पत्रकर सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष, प्रफुल दिवेकर युवा तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड हे उपस्थित होते.














