Home चंद्रपूर न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा उत्कृष्ट निकाल

न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा उत्कृष्ट निकाल

302

चिमूर ( प्रतिनिधी)
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा निकाल ९२.३६ टक्के लागला असुन दरवर्षी शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.इयत्ता १० वीच्या परीक्षेत एकुण १४४ विद्यार्थी बसले होते, यापॆकी २१ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त,५६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.
शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.नेहा वामन जुमडे ही असुन तिला ९१ टक्के गुण मिळाले आहे.कु.सृष्टी जयदेव रेवतकर हिला ८९.२० टक्के,कु.वंशिका सोनुजी बोंगिरवार हिला ८५.८० टक्के गुण मिळाले आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिलेले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कॊतुक संस्थेचे पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व पालकांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here