


कराड -आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या नियोजित महात्मा ज्योतिबा फुले स्कील डेव्हलपमेंट अँड ट्रैनिंग सेंट्र मध्ये लवकरच शिक्षक सह इतर भरती प्रकिया आणि विध्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याची माहिती आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे) या संस्थेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले स्कील डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर, कराड हे कराड येथे सुरु करण्याचा मानस आहे या निमित्ताने ‘संघर्ष मार्केट स्टेशन रोड सांगली येथील तिरंगा रक्षक या वर्तमानपत्राच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संपतराव मोहिते, अनिल बडेकर, सागर जाधव, संदीप मदने, पुरषोत्तम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले,संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही सामाजिक उपक्रम राबविले आहे आता त्याच्याबरोबर शिक्षण क्षेत्रात पदार्पण करून युवकांना स्वावलंबी बनविण्याचा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही चालू शैक्षणिक वर्षात वेल्डर, फिटर, सुतार, टेलरिंग, फॅशन डिझाईन, पत्रकारिता, योगा टीचर, इलेक्ट्रिशन यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्याचे आमचे नियोजन आहे. अत्यंल्प प्रवेश आणि ट्रेनिंग फी मध्ये हे अभ्यासक्रम आम्ही सुरु करणार आहोत. 15 ऑगस्ट 2024 रोजी पहिली बॅच सुरु करणार आहोत, त्यासाठी लिपिक, शिक्षक आणि इतर स्टाफ ची भरतीही आम्ही लवकरच जाहिरात प्रसिद्ध करून करणार आहोत.15 जुलै 2024 पासून विध्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करणार आहोत. आमच्या संस्थेत प्रवेश घेणारे विध्यार्थी हे सरकारी नोकरीसाठी पात्र ठरणार नसले तरी त्यांना स्वावलंबी बनवणे हाच संस्थेचा मुख्य हेतू असल्याचेही विश्वास मोहिते यांनी सांगितले.














