


साकोली : अल्कोहोलीक्स ॲनॉनिमसमधे आलेला मद्यपी हा दृढ इच्छाशक्तीने आपली दारू कायमची सोडतो. यावर अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस ही जागतिक स्तरावरील अनामिक मद्यपींची एक जागरूक संघटना आहे. यात बांधव केवळ परस्परांच्या वैयक्तिक अनुभव कथन करतात व सबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि एकमेकांच्या व्यसनाधिन जीवनातील आलेले अनुभव कथन करतात आणि ते ऐकून नविन बांधव दारू पासून मुक्त होत आज सुंदर जीवन जगत आहेत असे प्रतिपादन युनिटी समुह साकोलीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवार ( १७ मार्च ) ला निमंत्रित पाहुण्यांनी केले.
साकोली येथील जि. प. केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्र १ गणेश वार्डात अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस या मद्यपींसाठी मोफत असलेल्या संघटना युनिटी समुहाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यात अध्यक्ष मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, अतिथी डॉ. राजेश चंदवानी, विवेक बैरागी हे मंचावर हजर होते. आपल्या भाषणात अतिथींनी सांगितले की साकोली शहरात मद्यपींसाठी ही मोफत नियमित सभा आयोजन आवश्यक होते. या संघटनेला सर्वोपरी कोणतीही मदत लागेल तर आपण तत्पर आहोत असे सांगितले. साकोलीतील युनिटी समुहाने तब्बल दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, डॉ. राजेश चंदवानी व विवेक बैरागी यांनी पुढील प्रगतीसाठी युनिटी समुह व धैर्य समुह साकोली टिमला हार्दिक शुभेच्छाही दिल्यात द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यात आंतरसमुह गडचिरोली ग्रामीण ( उत्तर ) अंतर्गत निर्णय समुह सौंदड, निर्माण समुह बाम्हणी, मानवता समुह लाखांदूर, नवकिरण समुह देसाईगंज येथील सर्व बांधवांनी हा द्वितीय वर्धापन दिवस सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस युनिटी समुहाची मद्य सोडण्यासाठी मोफत नियमित सभा दर मंगळवारी जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा गणेश वार्ड येथे होत असते याचा लाभ मद्यपींनी ग्रासलेल्या कुटूंबीयांनी घ्यावा असेही पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले हे विशेष.













