


मोर्शी तालुका प्रतिनिधी /
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनाच वर्धा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी थेट खासदार शरदचंद्र पवार यांना पत्र पाठून केली आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघ महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचे तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक घडामोडीचा साक्षीदार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांना मिळाल्यास मोठे परिवर्तन घडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. वर्धा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार साहेबांनी हर्षवर्धन देशमुख यांच्यासाठी राखीव ठेऊन उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदार संघातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली असून वर्धा लोकसभा हा मतदारसंघ अन्य कोणत्याही पक्षासाठी सोडू नये असा आग्रह धरला आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना खासदार शरदचंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिल्यामुळे मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कामाला लागले असल्याचे दिसत असून हर्षवर्धन देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद सुरू केला आहे.
माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. दोनदा ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. शिवाजी शिक्षण संस्थेचा पदभार ते अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. वर्धा लोकसभा मतदार संघामध्ये हर्षवर्धन देशमुख यांच्या सारखा अनुभवी व जनतेला न्याय देणारा उमेदवार असून लाखो लोकांचा विश्वास संपादन केलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असतांना वर्धा लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन देशमुख यांना उमेदवारी मिळाल्यास हर्षवर्धन देशमुख यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केला आहे.













