Home महाराष्ट्र मोर्शी वरूड तालुक्यातील विविध तीर्थ क्षेत्रांना २८ कोटी ५४ लक्ष ९६ हजार...

मोर्शी वरूड तालुक्यातील विविध तीर्थ क्षेत्रांना २८ कोटी ५४ लक्ष ९६ हजार रुपयांचा निधी ! आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लागणार ! वरूड मोर्शी तालुक्यातील देवस्थानानांचा सुवर्णकाळ सुरू : आमदार देवेंद्र भुयार

148

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरूड तालुक्यातील सालबर्डी, अंबाडा, पाळा, अमानेर, मुसळखेडा, लोणी, गव्हाणकुंड, येथील विविध धार्मिक तीर्थ स्थळांच्या विकासा करीता आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेऊन येथील सर्व तीर्थ स्थळांच्या विकासासाठी २८ कोटी ५४ लक्ष ९६ हजार रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून मोठे योगदान दिले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे ब वर्ग दर्जा प्राप्त झालेल्या तीर्थस्थळांना मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळे लाखो भक्तांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास कामासाठी जनतेचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी नऊ ते दहा कोटी पर्यंतचा निधी मिळाल्याने आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून मोर्शी वरूड तालुक्यातील विविध तीर्थ क्षेत्रांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागणार असल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
वरूड मोर्शी तालुक्यातील राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणाऱ्या मोर्शी तालुक्यातील श्री संत महादेव महाराज संस्थान सालबर्डी ३७७.२९ लक्ष रुपये, श्री संत मारोती महाराज संस्थान सालबर्डी ३१३.३० लक्ष रुपये,
श्री संत साच्चीतानंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट पाळा ३००.०२ लक्ष रुपये, श्री क्षेत्र मुदगलभारती संस्थान अंबाडा ४९९.९२ लक्ष रुपये, वरूड तालुक्यातील श्री संत यशवंत महाराज संस्थान मुसळखेडा १९५ लक्ष रुपये, जलालुद्दीन बाबा दर्गा आमनेर, वंदनीय वसंत महाराज संस्थान लोणी २०० लक्ष रुपये, वंदनीय वसंत महाराज संस्थान लोणी ४९९.९२ लक्ष रुपये, श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थान उर्फ महादेव संस्थान गव्हाणकुंड ४६९.३८ लक्ष रुपये, मोर्शी वरूड तालुक्यातील या सर्व ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामाांच्या २८ कोटी ५४ लक्ष ९६ हजार रुपयांचा विवीध अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामध्ये मुख्य इमारत, पाणी पुरवठा व स्वच्छता, वाहनतळ, स्वच्छ्तागृह, पाण्याच्या टाक्या, पंप हाऊस, सौर ऊर्जा, अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत रस्ते, दिव्यांगाकरीता रॅम्प, विद्युतीकरण यासह विविध कामांचा समावेश असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोर्शी वरूड तालुक्यातील विविध देवस्थानाच्या विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे. पर्यटन क्षेत्र विकास योजनेंतर्गत मतदार संघातील तीर्थस्थळांना निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगून मोर्शी वरूड तालुक्यातील तीर्थ स्थळांचा सुवर्ण काळ सुरू झाला असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here