Home महाराष्ट्र अखिल शिक्षक संघाने जपली सामाजिक बांधीलकी-महाशिवरात्रीच्या निमित्ताने पानपोई व फळवाटप कार्यक्रम

अखिल शिक्षक संघाने जपली सामाजिक बांधीलकी-महाशिवरात्रीच्या निमित्ताने पानपोई व फळवाटप कार्यक्रम

117

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

नागभीड:- येथे वर्षानुवर्षापासून सुरू असलेली परंपरा शिवटेकडी येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या उल्हासात भरत असते. पंचक्रोशीतील शिवभक्त महादेवाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. उन्हाची तीव्रता लक्षात घेता भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रशासनाने उत्तम व्यवस्था केलेली असते. यामध्ये विविध राजकीय संघटना यांचेकडून नाश्ता व विविध कार्यक्रमांची रेलचेल असते .त्यामध्ये अखिल शिक्षक संघाने सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत सकाळपासून भक्तांना थंड पाणी व फळांचे वाटप करून आपली बांधिलकी सिद्ध केली. सर्व भक्तांसाठी सकाळपासून पाणपोई व नाश्ता मध्ये फळ वाटप करून सहकार्य केले. या स्तुत्य उपक्रमाची दखल सर्व राजकीय संगठना, प्रशासनाने घेऊन त्यांचे कौतुक केले. शिक्षक संघाच्या स्टॉल ला विविध मान्यवरांनि भेटी देऊन शिक्षक बांधवांचे अभिनंदन केले. या उपक्रमाच्या यशस्वी तेसाठी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप चंदनबावणे , सचिव- राहुल कळंबे ,अखिल संघाचे सल्लागार श्री राजकुमार एकवनकर ,गजेंद्र जवंजाळ ,संतोष आंबोरकर ,प्रभाकर , अरुण दोईतरे, लुमदेव मोरांडे विनोद सातव गिरीश नगरे नितीन अनरसकर रत्नाकर कामडी ,नानाजी सहारे विजय भेंडारकर मदन मरसकोल्हे राजू निमजे राजेंद्र दोनोडे वीरेंद्र सायरे ईश्वर ढाकरे मंगेश कोरे पिराजी कांदे मंगेश नौकरकर, सतीश गायधने ,संदीप कुमरे सतीश गायधने प्रशांत कोरे नंदा दुरबुडे माया सहारे वनमाला महाजन माधुरी वरखडे रेखा आकरे वंदना लोहारे तसेच जेष्ठ नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला विशेष सहकार्य प्राथमिक शिक्षक सोसायटी सिंदेवाही व नागभीड तसेच जुनी पेन्शन संगठना नागभीड यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here