Home महाराष्ट्र प्रा.डॉ.अशोक गंगाराम साबणे यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित. मराठवाड्यातील मंदिरे...

प्रा.डॉ.अशोक गंगाराम साबणे यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित. मराठवाड्यातील मंदिरे आणि मूर्ती शिल्पे यावर संशोधन.

289

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय हणेगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयातील माजी प्राचार्य प्रा.डॉ.अशोक गंगाराम साबणे हे इतिहास विभागाचे अभ्यासक यांना संशोधन व शैक्षणिक , सामाजिक क्षैत्रात दिला जाणारा सन.2023 चा राष्ट्रीय राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे असताना अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये पदवी,
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असता .पुढे त्यांनी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथे कै.बापूसाहेब पाटील एकबेंकर महाविद्यालयामध्ये प्रपाठक म्हणून सन 1997 साली रुजू होऊन अत्यंत हलाखी परिस्थितीमध्ये पी.एचडी. करून घेतली. सामाजिक बांधिलकी जोपासत असताना इतिहास विषयाशी संबंधित मनोगत आणि व्याख्याने त्यांचा नेहमीचा विषय असायचा. आर्थिक परिस्थितीचा सामना कसा करावा?हे मात्र त्यांनी अनुभवातून सिद्ध करत महापुरुषांचा विचाराचा वारसा जपत असता चिकाटी आणि ध्येय प्राप्त केले . त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.नुकताच त्यांना शै.वर्ष 2023 चा युनिव्हर्सल रिसर्च ग्राउंड फाउंडेशनचे राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या सन्मान , पुरस्कारा बद्दल त्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक मंडळी व गंगाखेड येथील त्यांचा सर्व मित्र परिवार प्रा . डॉ.शेषराव पारवे,संजय भालेराव,प्रा.प्रकाश जंगले ,सुनील साळवे, त्र्यंबक भालेराव, उत्तम वाव्हळे,संजय साबणे, राहूल साबणे, गुणवंत कांबळे इत्यादींनी अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here